* युवकाला फसवणूकीतील मिळवून दिले 2 लाख रूपये
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
बुलढाणा सायबर पोलीस स्टेशन ला गेल्या 24 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी शेख फैझान फारुख अहेमद यांनी रिपोर्ट दिला की, काही अज्ञातांनी गुगलवर फेक वेबसाईट बनवुन यातील फि ची 5 लाख 40 हजार रुपयाची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली आहे, असे रिपोर्टवरुन सायबर पो.स्टे. बुलढाणा येथे अपराध कलम 419, 420 IPC R/w 66 c d IT Act प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन ठाणेदार सारंग नवलकार यांनी पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधिक्षक बी.बी. महामुनी यांचे मार्गदर्शनाने सायबर पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल शकील खान, पोलीस नाईक राजदीप वानखडे, पोलीस नाईक विक्की खरात, पोलीस कॉन्स्टेबल क्षितीज तायडे, केशव घुबे, संदीप राऊत, ऋषिकेश खंडेराव यांनी तांत्रीकरीत्या गुन्हयाचे चक्रे फिरवीत गुजरात येथील आरोपींचा पंजाब राज्य येथुन सिनेस्टाईल पाठलाग करत गुन्हयातील 5 आरोपींना एका कारसह अटक करुन त्यांचे ताब्यातुन एकुण 8 लाख 68 हजार 200 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यापैकी नगदी रोख रक्कम 2 लाख 1 हजार 200 रुपये वि. न्यायालय बुलढाणा यांचे आदेशाने सायबर पो.स्टे. ठाणेदार प्रमोद इंगळे यांचेहस्ते दोन पंचा समक्ष यातील फिर्यादी यांना 26 जून रोजी परत करण्यात आले.
सद्या ट्रेन्ड मध्ये असलेल्या डिजीटल अरेस्ट, शेयर मार्केट ट्रेडींगचे नावावर लोकांना भुर्दंड घालणाऱ्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्म पासून सावध राहण्याचे आव्हान सायबर पोलीस यांच्याकडून करण्यात येत आहे. तसेच अशा प्रकारे जनसामान्याबरोबर सायबर फ्रॉड झाल्यास आपली तक्रार तात्काळ NCCRP पोर्टलवर (1930) नोंदवावी, असे आव्हान सायबर पोलीसांच्या वतीने करण्यात येत आहे.