जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळघाट येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळघाट येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
     पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळघाट या शाळेत  23 जून 2025 रोजी शाळेत शासन निर्णयानुसार शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन प्रवेशित आणि सर्व विद्यार्थ्यांची ढोल पथकासह गजरात प्रभात फेरी काढण्यात आली. याप्रसंगी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, मोफत बूट सॉक्स तसेच शाळेच्या मुख्य प्रवेशव्दारावर पुष्पगुच्छ,  गुलाब पुष्प पाकळ्यांचा वर्षाव करून शाळेचे प्राचार्य आर. आर. सय्यद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. अलकाताई किटे, उपाध्यक्ष शैलेश सब्बलवार, शिक्षणतज्ञ अमोल जाधव यांच्यासह इतर सदस्य गण, शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद यांच्याहस्ते आनंददायी व प्रसन्न वातावरणात शाळेच्या मुख्य प्रवेशव्दारावर स्वागत करण्यात आले.

        याप्रसंगी वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी, डॉक्टर महेंद्र सरपाते तालुका आरोग्य अधिकारी, पंचपायत समिती बुलढाणा, डॉक्टर रणजीत मंडले, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांनी शाळा प्रवेशोत्सवा बाबत शाळेस भेट देऊन शाळेची पाहणी केली.  शालेय कामकाज, नियोजन, स्वच्छता व शालेय प्रशासनाबाबत समाधान व्यक्त केले.

        शाळा प्रवेशोत्सवाची औचित्य साधुन "एक पेड माँ  के नाम" या उपक्रमांतर्गत नवीन प्रवेशित विद्यार्थी, त्यांच्यासोबत त्यांच्या उपस्थित माता-भगिनी, डॉक्टर महेंद्र सरपाते तालुका आरोग्य अधिकारी बुलढाणा, डॉक्टर रणजीत मंडले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा, प्राचार्य आर.आर. सय्यद  पालकवर्ग, शिक्षकवृंद यांच्या हस्ते शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

       शाळा प्रवेशोत्सवाचे औचित्य साधुन नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेशित होण्याचा क्षण स्मृतीबध्द करण्यासाठी शाळेमध्ये तयार करण्यात आलेला सेल्फी पॉइंट हे आकर्षणाने केंद्र होते. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी सेल्फी घेतल्याचा आनंद घेऊन हा प्रवेशोत्सवाचा क्षण स्मृतिबद्ध केला.

      याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रणजीत मंडले यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, सुदृढ आरोग्यासाठी चांगल्या आरोग्यदायी सवयी, त्याचा अध्ययन -अध्यापन प्रक्रियेशी संबंध यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य आर. आर. सय्यद यांनी त्यांचे भाषणातून शंभर टक्के पट नोंदणी, शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढीसाठी शिक्षकवृंदांचे प्रयत्न, शालेय गुणवत्ता वृद्धीसाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदांचे उत्तम नियोजन, शिक्षक वृंदांची उच्च विद्या विभूषित पदव्या व ज्ञान याचा या शाळेतील विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याबाबत. यापुढे सुद्धा उत्कृष्ट गुणवत्ता वृद्धी, पालकांचा शाळेवरील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विश्वास या कसोटीवर खरे, खरे उतरण्यासाठी तसेच त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.

        या कार्यक्रमासाठी देऊळघाट येथील अंगणवाडी सेविका आशा वर्कर पालक, गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सखाराम कड,  मोहम्मद सलमान,  प्रल्हाद शेनफड गायकवाड यांनी केले तर आभारप्रदर्शन  सय्यद अनिस यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

        शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश, बुट-सॉक्स्, आणि पाठ्यपुस्तके मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य व आनंद दिसून आला. विद्यार्थ्यांना याप्रसंगी गोड भात, खिरचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.