अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक : नंदिनीताई टारपे* आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची बैठक संपन्न

अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक : नंदिनीताई टारपे
* आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची बैठक संपन्न
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
          आदिवासीच्या न्याय व हक्कासाठी साततत्याने काम करणाऱ्या आदिवासी विकास परिषदेची  16 जून रोजी खामगांव येथे बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुखदेवराव डाबेरावं तर प्रमुख पाहूणे परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष नंदिनीताई टारपे, बबलूभाऊ राठोड, ज्ञानेश्वर राठोड व वाशिमच्या जिल्हाध्यक्ष सिताताई धंदरे, महासचिव संगीताताई बारेला होत्या. यावेळी खामगाव तालुका अध्यक्ष, इतर पदअधिकाऱ्याच्या नियुक्त्या करण्यात आल्या.  विदर्भस्तरीय प्रबोधन मेळाव्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. 
       यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष नंदिनीताई टारपे यांनी आपल्या भाषणतून आजही देशातील आदिवासी समाज मागासलेला असून आद्याप पर्यंत आदिवासी समाजाचा विकास झाला नाही, शासनाच्या योजना कागदावरच असून प्रत्यक्षात खऱ्या आदिवासीना लाभ मिळत नाही, शासन आदिवासीचा निधी इतरत्र वापरत असल्यामुळे आदिवासी फार मोठा अन्याय होत आहे, त्यामुळे आदिवासीचा विकास थांबणार आहे. म्हणून अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आदिवासीनी एकत्र येण्याची आवशकता आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी नेते सुखदेवराव डाबेराव यांनी येणाऱ्या काळात एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे मत व्यक्त केले. तसेच खामगावचे गजाननभाऊ सोळंके यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी खामगांव अध्यक्ष गोपाल चव्हाण, शेगाव तालुका अध्यक्ष अमोल राठोड, मेहकर तालुका अध्यक्ष वासुदेव बोरकर,निलेश रामदास पवार,मंगल सिंग राठोड महेंद्र चव्हाण, भिमसिंग पवार, निलेश पवार,सागर चव्हाण, विनोद डाबेराव, प्रताप राठोड,विनोद सोळंके,मोताळा तालुका अध्यक्ष विजय चव्हाण भोसले, वासुदेव बोरकर,महेंद्रसिंग डाबेराव,लक्ष्मण सोळंके इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्तावित जिल्हाध्यक्ष सोपान सोळंके यांनी केले तर सूत्रसंचालन मंगलसिंग राठोड यांनी व आभार प्रदर्शन महेंद्रसिंग चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.