कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा नदीत बुडून करुण अंत !

कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा नदीत बुडून करुण अंत !
चिखली :  (एशिया मंच न्युज)
      तालुक्यातील अमडापूर येथील नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुली पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज 18 जून रोजी दुपार दरम्यान घडली. 
       सदर घटणेबाबत मिळालेली माहिती अशी की, राजनंदीनी निंबाजी नाटेकर वय 10 वर्ष रा. बीबी, वैष्णवी महादेव खंडारे वय 17 वर्ष रा. कवळा ता.चिखली असे मृतकांची नावे आहेत. राजनंदीनी निंबाजी नाटेकर ही इयत्ता पाचवीत शिकत होती.

          राजनंदीनी व तिची आते बहीण वैष्णवी ह्या दोघी दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान त्यांच्यावर नियतीने डाव साधला. त्या दोघीही नदीत बुडाल्याने त्यांचा करुण अंत झाला आहे. त्यांचे मृतदेह चिखली येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहेत.