प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजना* जिल्ह्यात”मॉडेल सोलर व्हिलेज" ची निवड होणार : जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील* १ कोटी रूपयाचे केंद्रीय अर्थ सहाय्य मिळणार

प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजना
* जिल्ह्यात”मॉडेल सोलर व्हिलेज" ची निवड होणार : जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील
* १ कोटी रूपयाचे केंद्रीय अर्थ सहाय्य मिळणार
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
          ग्रामीण भागातील प्रत्येक घर, समुदायांना ऊर्जा स्वावलंबी बनविणे, सौरऊर्जेचा वापर वाढविणे आणि पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांचा प्रसार करण्यासाठी जिल्ह्यात महावितरण प्रधानमंत्री सुर्यघर मोफत याजना राबविण्यात येत आहे.या योजनेअंतर्ग शंभर टक्के सौर प्रकल्प स्थापन करण्यात आलेल्या गावांमधून स्पर्धात्मक पध्दतिने एका "मॉडेल सोलर व्हिलेज" ची निवड होणार असून ,निवड करण्यात आलेल्या या मॉडेल सोलार व्हिलेजला केंद्रशासनाचे १ कोटी रूपयाचे अर्थसहाय्य उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे.

            महावितरणच्या माध्यमातून राज्यात प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत "मॉडेल सोलर व्हिलेज" उपक्रमाची अंमलबजावणी राज्यासह देशभरात सुरू झाली आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक जिल्ह्यात एक गाव निवडून त्यास सौरऊर्जेवर आधारित, ऊर्जा स्वावलंबी मॉडेल व्हिलेजमध्ये रूपांतरित करणे आहे.

       मॉडेल सोलर व्हिलेजची निवड जिल्हास्तरीय समितीव्दारे स्पर्धात्मक पध्दतीने करण्यात येणार आहे.उमेदवार गाव म्हणून पात्र होण्यासाठी जिल्ह्यात ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले महसूल गाव असणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय समितीव्दारे सहा महिन्यांनी स्पर्धेतील गावांची एकूण वितरित अक्षय ऊर्जा (RE) क्षमतेवर मूल्यांकन केले जाणार आहे आणि सर्वाधिक आरई क्षमता असलेल्या गावाची मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून निवड केली जाणार आहे.

          जिल्हा समितीव्दारे निवड करण्यात आलेल्या "मॉडेल सोलर व्हिलेजला" १ कोटी रूपयाचे केंद्रीय आर्थिक सहाय्य अनुदान मिळेल. प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेची राज्यात अंमलबाजाणी करण्याची जबाबदारी महावितरणची असल्याने महावितरण आणि सोलर व्हिलेज स्थापन करण्यासाठी तयार करण्यात आलेली जिल्हा समितीच्या देखरेखीखाली मॉडेल गावांचे यशस्वीपणे सौरऊर्जेकडे संक्रमण होईल आणि देशभरातील इतरांसाठी बेंचमार्क सेट होईल.