जैन कुटुंबीयांची भेट !
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पहलगाम येथे असलेल्या व बुलडाणा येथे सुखरूप परत आलेल्या पारस व ऋषभ जैन यांची केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकतीच भेट घेऊन विचारपूस केली.
यावेळी त्यांच्या समवेत गर्दे वाचनालयाचे सचिव उदय दादा देशपांडे, माजी नगरसेवक मंदार बाहेकर, सेवानिवृत्त शिक्षक सुरेश जैन, विकासराव खक्के, पत्रकार अरुण जैन, युवराज वाघ, बाळू जाधव आदी उपस्थित होते. मंत्री महोदयांनी या दोन्हीही तरुणांसोबत जम्मू काश्मीरमधील परिस्थिती, घटनेच्या वेळी असलेले वातावरण, पर्यटनाचा अनुभव या संदर्भात चर्चा व विचारपूस केली.