महात्मा गांधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे निबंध स्पर्धेत सुयश

महात्मा गांधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे निबंध स्पर्धेत सुयश 
 बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
         कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतीय राज्यघटनेच्या 75 वर्षपूर्ती निमित्त संविधान गौरव महोत्सव अंतर्गत स्वरचित निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विश्वविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विश्वविद्यालयातील विद्यार्थी व सलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये महात्मा गांधी प्रशासकीय सेवा महाविद्यालय दुधा येथील एम.ए. लोकप्रशासन प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कु. साक्षी सास्ते हिने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. कु.साक्षी सास्ते या विद्यार्थिनींने भारतीय संविधान या विषयावर लिहिलेल्या निबंधाला विश्वविद्यालयाच्या वतीने प्रथम पारितोषिक देण्यात आलेले आहे. कु. साक्षी सास्ते च्या या यशाबद्दल तिला विश्वविद्यालयाच्या वतीने रुपये 1001 रुपये रोख व प्रशस्तीपत्र पत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे. 
        यावेळी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. जयवंत चौधरी यांनी कु. साक्षी सास्तेचे अभिनंदन केले आहे. कु. साक्षी सास्तेच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी यांनी तिचे कौतुक केले आहे. तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाच्या वतीने ही कुमारी साक्षी सास्ते हीचे अभिनंदन करण्यात आले आहे.