देऊळगाव राजा : (एशिया मंच न्युज)
जागतिक मातृत्व दिनाचे निमित्ताने महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी नगरपरिषद प्रशासन व भारतीय जैन संघटना शाखा देऊळगाव राजा चे वतीने 11 मे 2025 रोजी महिला सक्षमीकरण या विषयावर बुलढाणा येथील सेवानिवृत्त प्राचार्य कु. शाहीना पठाण यांचे व्याख्यानाचे आयोजन नगरपरिषद च्या सभागृहात करण्यात आलेले आहे.
कु. शाहीना पठाण या गेल्या 40 वर्षापासून महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत कार्य करीत आहेत, त्या अंतर्गत त्यांनी महिलांचे ज्वलंत प्रश्न प्रत्यक्ष हाताळले असून महिला विषयक असणारे कायदे, आरोग्य, घरेलू हिंसा, कौटुंबिक समुपदेशन, व महिला सक्षमीकरण विषयी कार्यशाळा आयोजित करून जिल्हाभरातील महिलांमध्ये जनजागृती चे काम अविरतपणे करीत आहे. सदर महिला सक्षमीकरण व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आव्हान नगरपरिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ व भारतीय जैन संघटनेचे सन्मती जैन यांनी केले आहे.