*केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव करणार शिबिराचे उद्घाटन
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या भुमिपुत्र वैद्यकीय कक्षेच्यावतीने मोफत किडनी प्रत्यारोपन (किडनी ट्रान्सप्लाट ) आरोग्य शिवीराचा आयोजन 11 मे रोजी मेहकर येथे करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा केंद्रीय आयुष , आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकांच्या आरोग्य सुविधेसाठी बुलढाणा येथील जनसंपर्क कार्यालयात भूमिपुत्र वैद्यकीय आरोग्य कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या कक्षाच्या मार्फत रुग्णांना वैद्यकीय मदत केल्या जात आहे. आतापर्यंत भूमिपुत्र वैद्यकीय कक्षेच्यावतीने मोफत वैद्यकीय शिबिर , नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. गरजूंना वैद्यकीय सेवा आणि मार्गदर्शन देण्याचे काम केल्या जात आहे. शिवाय ग्रामीण भागातील नागरिकांना महानगरात एम्स रुग्णलयातही आरोग्य विषयक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येत आहे. येणाऱ्या काळामध्ये भुमिपुत्र वैद्यकीय कक्षेच्यावतीने
मोफत किडनी प्रत्यारोपन (किडनी ट्रान्सप्लाट ) शरत्रक्रिया करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे.या रुग्णाची नाव नोदणी करण्यात आली असून मुत्रपिंड प्रत्यारोपन (किडनी ट्रान्सप्लाट ) संदर्भात आरोग्य शिबिर ११ मे रोजी मेहकर येथील राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालय येथे आयोजीत करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हाचिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर, युवासेना प्रदेश सहसचिव तथा जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव उपस्थित राहणार आहे तर छत्रपती संभाजी नगर येथील किडनी ट्रान्सप्लाट संदर्भातील तज्ञ डॉक्टर्स समीर महाजन , कमल नयन बजाज येथील निखिल इंगळे, जॉर्ज फर्नांडिस, डॉ. अजय रोपे उपस्थित राहून रुग्णांची आरोग्य तपासणी करणार आहे. त्यानंतर त्यांची मोफत मुत्रपिंड प्रत्यारोपन (किडनी ट्रान्सप्लाट) शरत्रक्रिया करण्यात येणार आहे. गरजूंनी या मोफत मुत्रपिंड प्रत्यारोपन (किडनी ट्रान्सप्लाट) शरत्रक्रिया आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भूमिपुत्र वैद्यकीय कक्षेच्यावतीने करण्यात आले आहे.