केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अडकलेल्या पर्यटकांना बसविले रेल्वे गाडीत *जम्मू काश्मिरवरून रेल्वे दिल्लीकडे रवाना

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अडकलेल्या पर्यटकांना बसविले रेल्वे गाडीत 
*जम्मू काश्मिरवरून रेल्वे दिल्लीकडे रवाना
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
      जम्मू कश्मीर येथे अडकून पडलेल्या   पर्यटकांना स्वतः रेल्वेत बसून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीकडे रवाना केले आहे. 

       जम्मू कश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या घटनेनंतर अनेक पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकून पडले होते. त्यांना घराकडे परत यायचे होते, त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्यावतीने विशेष रेल्वे सोडण्यात आली. अडकलेल्या पर्यटकांना रेल्वे स्थानकावर आणून रेल्वे गाडीत बसून देण्याचे काम केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे, हे सर्व पर्यटक दिल्लीला येणार आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या गावाकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गाने पाठवण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारच्या वतीने रेल्वेमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे आता हे पर्यटक आपल्या गावी सुखरूप पोहोचणार आहेत.