बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
माणूसकीला किनार देत जम्मू काश्मीर मधील पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ ते २८ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय निंदनीय असून या हल्ल्याचा निषेध आज २४ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्हा (उबाठा) शिवसेना पक्षाच्या वतीने स्थानिक संगम चौक येथे पाकिस्तान मुर्दाबाद, निषेध असो, निषेध असो, दहशतवाद्यांचा निषेध असो अशा जोरदार घोषणाबाजी देत निषेध नोंदविण्यात आला. या निषेधात शिवसैनिकांनी हाताला काळ्या फिती बांधून घटनेचा निषेध केला.
यावेळी शिवसेना प्रक्त्या अॅड. जयश्रीताई शेळके, संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, जिल्हा संघटक डि.एस. लहाने, वसंतराव भोजने, सह संपर्क प्रमुख छगन मेहेत्रे, जिल्हा संघटक गोपाल बछिरे, युवासेना जिल्हा प्रमुख नंदु कऱ्हाडे, लखन गाडेकर, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ, उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, सुनील घाटे, मो. सोफियान, बद्रि बोडखे, तुकाराम काळपांडे यांचेसह शिवसेनेच्या सर्वच आघाडीचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, विधानसभा संघटक, तालुका संघटक, उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख यांचेसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.