भारतात तयार होऊन भारताबाहेर सामाजिक काम करणारी एकमेव संस्था म्हणजे "जायंटस" : विनोद शेवतेकर

भारतात तयार होऊन भारताबाहेर सामाजिक काम करणारी एकमेव संस्था म्हणजे "जायंटस" :  विनोद शेवतेकर
देऊळगाव राजा : (एशिया मंच न्युज)
          आतापर्यंत ज्या-ज्या NGO या भारताबाहेर तयार होऊन त्या- त्या NGO चे भारतात काम सुरू आहे, एक अशी NGO आहे की त्याची स्थापना भारतात होऊन त्याचे कार्य हे भारताबाहेर सुरू आहे ती म्हणजे जायंटस वेल्फेअर फाउंडेशन देऊळगाव राजा ग्रुपच्या पदग्रहण समारंभ प्रसंगी फेडरेशनचे स्पेशल कमिटी सदस्य विनोद शेवतेकर यांनी उपस्थितांना माहिती देतांना  सांगितले.

        यावेळी सन 2025 करीता देऊळगावराजा ग्रुपचे अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते कल्याण सूर्यकांत चांडगे यांची निवड करण्यात आली असून आज त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम श्री गुगुळा देवी मंदिर संस्थान येथे पार पडला. यावेळी फेडरेशनचे पदाधिकारी व शहरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की,   देऊळगाव राजा येथे 1993 मध्ये जायंट्स वेलफेअर फाऊंडेशन ची स्थापना झालेली असून शहरात व पंचक्रोशीत विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक, पर्यावरण विषयक,  मरनोत्तर नेत्रदान आयोजित करत आहे तर गेल्या 26 वर्षापासून दरवर्षी होळी उत्सव  सणानिमित्ताने भव्य हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येते. सोबतच गेल्या 16 वर्षात 160 नागरिकांचे मरणोत्तर नेत्रदान करून जवळपास 320 नागरिकांना हे सुंदर जग पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.  27 एप्रिल रोजी नवनियुक्त अध्यक्ष कल्याण सूर्यकांत चांडगे यांना जायंटस ग्रुपच्या अध्यक्षपदी निवड केल्याप्रसंगी त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नवीन कार्यकारीणीमध्ये उपाध्यक्ष डॉक्टर अशोक काबरा, अरुण कायस्थ, सचिव श्याम गुजर, कोषाध्यक्ष जुगल किशोर हरकुट यांचा समावेश आहे. कार्यक्रमासाठी सेवा निवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे, फेडरेशनचे स्पेशल कमिटी सदस्य विनोद शेवतेकर, श्रीमती सूर्यमाला मालानी, फेडरेशन अध्यक्ष गुरुदत्त राजपूत, सचिव रंजना भावसार, नरेश गुप्ता, अमित मालानी, पुरुषोत्तम धन्नावत, रत्नाकर महाजन, जुगलकिशोर हरकुट, सन्मती जैन, श्याम गुजर, राजेश तायडे उपस्थित होते.    शपथविधीनंतर सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, जायंटस परिवाराने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती मी आपल्या संपूर्ण सदस्यांच्या सहकार्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल व शहरात नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी नियोजन करेल. कार्यक्रमाचे संचलन पुरुषोत्तम धन्नावत यांनी केले तर कार्यकारिणी सदस्य व अध्यक्ष, नवीन सदस्य दशरथ राठोड यांना सन्मती जैन यांनी शपथ दिली. आभार डॉक्टर अशोक काबरा यांनी मानले.  कार्यक्रमाचे सुरुवातीला पहलगाम मधील अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.  जायंटस परिवारातील स्व. मुनिरा नाना चुडासामा यांना सुद्धा श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.