बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी हल्ला करून २८ भारतीय नागरिकांची अमानुष हत्या केली. या घटनेचा निषेधार्थ आज २३ एप्रिल २०२५ रोजी भाजपा नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन सादर करून ह्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध नोंदवला. सोबतच वाढदिवसाच्या निमित्त आयोजित केलेले हास्य कवी संमेलन सुद्धा रद्द केले.
यावेळी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. "हा भ्याड हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा असून मोदी सरकारने जम्मू कश्मीर मध्ये कलम 370 हटविल्यानंतर जम्मू कश्मीरमध्ये शांतता बहाल व्हायला लागली होती. पर्यटन वाढायला लागले होते. जम्मू कश्मीर विकासाच्या पथावर असताना पाकिस्तानच्या आतंकवादांना ही बाब सहन झाली नाही. पुन्हा जम्मू कश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया वाढवुन येथील शांतता भंग करण्याचा त्यांचे मनसुबे आहे. पाकच्या आतंकवाद्यांनी आता पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर प्रचंड गोळीबार केला. अश्या प्रकारच्या भावना व्यक्त करून हल्ल्याचा निषेध केला. तसेच त्या आतंकवाद्यांना लवकरात लवकर शोधून त्यांचा खात्मा करण्यात यावा व यापुढे असा आतंकी हल्ला करतांना हल्लेखोरांनी एक हजार वेळा विचार करतील, असा बंदोबस्त करावा व त्यासाठी केंद्र सरकार सक्षम आहे अश्या भावना निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी भाजपा प्रदेश सदस्य दिपकजी वारे, भाजपा कामगार मोर्चा प्रदेश सचिव विश्राम पवार, भाजपा जिल्हा सचिव चंद्रकांत बरदे, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता शिंदे, भाजपा जिल्हा सचिव अशोक किंहोलकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम लखोटिया, योगेश राजपूत, भाजयुमो तालुकाध्यक्ष सतीश भाकरे पाटील, माजी शहराध्यक्ष अनंता शिंदे, कामगार मोर्चा प्रदेश सदस्य अण्णासाहेब पवार, भाजपा तालुका सरचिटणीस सचिन शेळके, ऍड दशरथसिंग राजपूत, गणेश वैराळकर, पत्रकार नितीन शिरसाठ, मोहन निमरोठ, संतोष पालकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.