बुलढाणा जिल्हयातील 50 पर्यटक जम्मू काश्मिरमध्ये…! * सुखरुप घरी पोहचविण्यासाठी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयाशी साधला संपर्क * गृह विभागाच्या मदतीने करण्यात येत आहे प्रयत्न

बुलढाणा जिल्हयातील 50 पर्यटक जम्मू काश्मिरमध्ये…! 
* सुखरुप घरी पोहचविण्यासाठी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयाशी साधला संपर्क 
* गृह विभागाच्या मदतीने करण्यात येत आहे प्रयत्न
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
        जम्मू काश्मिरातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यानंतर भयभित झालेले जम्मू काश्मिरमध्ये बुलढाणा जिल्हयातील सुमारे 50 नागरीक अडकुन पडले आहेत. त्यांनी घरी सुखरुप पोहचविण्याच्या दृष्टीकानातुन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला आहे. गृह विभागाच्या मदतीने उपाययोजना करण्यात येत असल्याची माहीती केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातुन देण्यात आली आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदविला आहे.
     केंद्र सरकारने केलेल्या विविध उपाय योजनांमुळे जम्मू काश्मिरमध्ये पर्यटकांचा ओढा वाढलेला असतांना देशामध्ये धर्माच्या नांवावर विभाजन करण्याच्या दृष्टीकोनातुन दहशतवाद्यानी जम्मू काश्मिरमध्ये गेलेल्या पर्यटकांवर लक्ष करत गोळीबार केला. यामध्ये 26 जण मृत्युमुखी पडले असुन त्यातील 6 जण हे महाराष्ट्रातील आहेत. बुलढाणा जिल्हयातील जवळपास 50 पर्यटक जम्मू काश्मिरमध्ये पर्यटनांसाठी गेलेले आहेत हे सर्व पर्यटक सुखरुप आहेत. अनेकांनी केंद्रीयमंत्री तथा जिल्हयाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या दिल्ली येथिल कार्यालयाशी संपर्क साधला असुन त्यांना घरी सुखरुप पोहचविण्याच्या दृष्टीकोनातुन प्रयत्न करण्यात येत आहे. बुलढाणा येथिल पत्रकार अरुण जैन यांच्या कुटूंबातील 5 व्यक्ती जम्मू काश्मिर पर्यटनासाठी गेलेले आहेत, त्यांचे कुटूंबीय सुखरुप आहेत. इतर 45 जण जम्मू काश्मिर मध्ये अडकुन पडलेले आहे. दहशतवादी हल्यानंतर अडकुन पडलेले सर्व पर्यटक भयभित झाले आहेत. त्यांची मागणी घरी सुखरुप पोहचण्याची आहे. या संदर्भांत गृह विभागाशी संपर्क साधण्यात आला आहे. त्या सर्वांना सुखरुप घरी पोहचविण्याच्या दृष्टीकोनातुन उपाययोजना करण्यात येत आहे, अशी माहीती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातुन देण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.