बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने स्थापन केलेल्या आयुष विभागांतर्गत गेल्या दहा वर्षांमध्ये विविध कामे केल्या गेलीत आज भारतीय पारंपारिक योग अभ्यासाला जागतीकस्तरावर केल्या जात असून 21 जूनला हा दिवस जागतिक योगा दिन म्हणून सर्वत्र साजरा होत आहे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले.
होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांच्या जयंती औचित्य साधून
होमिओपॅथी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉक्टरांचा होमिओपॅथी जीवन गौरव पुरस्कारचे वितरण 12 एप्रिलला सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आयुषमंत्री प्रतापराव जाधव बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भारतीय आरोग्य सेवेत गुणवत्तापूर्वक उपचार पद्धतीत होमिओपॅथीची भूमिका ही महत्त्वपूर्ण राहिली आहे. होमिओपॅथी उपचार पद्धतीच्या माध्यमातून व्याधी दुरुस्त करण्याचे काम केले जात आहे. ही उपचार पद्धती विश्वास पात्र ठरत असून लोकांचाही कल या उपचार पद्धतीकडे वाढला आहे. नागरिकांना सहज आणि माफक दरात आयुर्वेदिक, होमिओपॅथीची औषधी मिळावीत या दृष्टिकोनातून जनरिक औषधी केंद्राच्या धर्तीवर देशांतर्गत आयुष औषधालय सुरू करण्यासंदर्भात केद्र सरकाराचा विचाराधीन असल्यासचे ही त्यांनी सांगितले.
उल्हासनगर येथील प्रसिद्ध होमिओ तज्ञ डॉ. अमरसिंह गौतम, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पळसखेडा येथील होमिओ तज्ञ डॉ. बाळासाहेब ना. महानोर, डेबको या होमिओपॅथी औषध निर्मिती संस्थेचे प्रमुख नंदकिशोर देशपांडे यांना होमिओपॅथी जीवनगौरव पुरस्कार देऊन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कैलास झिने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भागवत भुसारी,
जेष्ठ होमिओ तज्ज्ञ तथा पंचशील होमिओपॅथिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. दादासाहेब कवीश्वर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अजित शिरसाट, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. दूर्गासिंग राजपुत यांच्यासह युनानी होमिओपॅथी आयुष अंतर्गत काम करणारे डॉक्टर्स उपस्थित होते.