विद्यार्थ्यांच्या सप्तगुंणाना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम

विद्यार्थ्यांच्या सप्तगुंणाना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम
चिखली : (दगडू यादव : एशिया मंच न्युज)
        तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या सप्तगुंणाना वाव मिळविण्यासाठी आज १ फेब्रुवारी रोजी सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कण्यात आले होते. यावेळी उ‌द्घाटक आर. आर. पाटील गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती चिखली, प्रमुख अतिथी म्हणून गजानन पोफळे गट विकास अधिकारी पंचायत समिती चिखली, तर गुलाबसिंग सोनारे सरपंच धोत्रा भणगोजी, अनाळकर केंद्र प्रमुख शेलसुर यांची उपस्थिती लाभली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. उमाताई विवेक पवळ अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती यांनी भूषविले होते.

           या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जे-जे पात्र घेतले होते. ते त्यांनी या व्यासपिठावर अगदी आनंदात जी भुमिका घेतली होती. ती खुल्या मनाने सादर करीत उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. यावेळी उपस्थितांनी प्रत्येक सादर केलेल्या भुमिकेला विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवित टाळ्या वाजवून त्यांना साथ दिली. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यात येथील शिक्षक वृंदांचा मोलाचा वाटा आहे. पुढील भविष्यात ह्या विद्यार्थ्यांना हे सांस्कृतिक कार्यक्रम एक मोलाचे व्यासपिठ ठरेल, असे उपस्थित मान्यवरांचे सुर निघत होते.

* गट विकास अधिकारी पोफळे यांचा सत्कार

         जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा धोत्रा भणगोजी येथे वर्ग पहिल्यापासुन शिक्षण घेतलेले गावातील रहिवासी गजानन पोफळे हे आज गट विकास अधिकारी या पदापर्यंत पोहचले असुन त्यांचा सत्कार या शाळेत आयोजित करण्यात आला होता. या सत्काराला उत्तर देतांना त्यांनी सांगितले की, खरचं आज खूप आनंद होत आहे. कारण मी याच शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन आज गट विकास अधिकारी पदावर आहे. माझे एकच म्हणणे आहे, या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या मनाशी गाठ बांधून एकच निश्चय करायचं आहे की, तो म्हणजे उपाशी असलो तरी अभ्यासाला अंतर देण्याचे नाही, कारण शिक्षण हेच आपले भविष्य निर्माण करते, असे त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना हा एक संदेश दिला.

        शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मनापासून आभार मानले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, माजी उपसरपंच, पत्रकार दगडू यादव, मन्सूर शाह, रामदास शेडगे यांच्यासह गावातील जेष्ठ नागरिक, युवक वर्ग, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.