* अन्यथा 5 फेब्रुवारी पासून सामूहिक उपोषणाचा इशारा
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
तालुक्यातील सातगाव म्ह. येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे पाणी शेतीसाठी, पिकांसाठी जनावरांसाठी वापरले जाते. मात्र २७, २९ जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात वाळू उपसा करणाऱ्यांनी या कोल्हारी बंधाऱ्याचे पाणी सोडल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, सातगाव म्ह. येथील कोल्हापुरी बंदरातील पाण्याचा उपयोग शेतकरी शेतीसाठी, नागरिक पिण्यासाठी व जनावरांसाठी नियमित करीत असते. मात्र २७ व २९ जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात वाळू वाहतूक करणाऱ्यांनी बंधाऱ्याचे लोखंडी प्लेट खुले करून त्यातील राखीव पाणी अवैधरित्या सोडून दिले. सदर प्रकरणी योग्य कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा ५ फेब्रुवारीपासून सातगाव म्ह. येथील शेतकरी सामूहिक उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनातून दीपक देठे, रामेश्वर शिंदे, प्रल्हाद पालकर, नंदकिशोर शिंदे, सुभाष जाधव, समाधान शिंदे, संदीप जाधव, पंढरी गवते, सुरेश शिंदे आदी शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.