उत्कर्ष महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन : नव्या पर्वाची सुरुवात* शिक्षण, कला आणि संस्कृतीचा संगम

उत्कर्ष महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन : नव्या पर्वाची सुरुवात
* शिक्षण, कला आणि संस्कृतीचा संगम
सिंदखेडराजा : (एशिया मंच न्युज)
       उत्कर्ष फाउंडेशन द्वारा संचालित उत्कर्ष कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, सिंदखेडराजा येथे वार्षिक स्नेहसंमेलन २०२४-२५ चे भव्य आयोजन करण्यात आले असून आज  २५ जानेवारी २०२५ रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 

      कार्यक्रमाचे उद्घाटन  सिद्धार्थ खरात, उत्कर्ष फाउंडेशनचे संस्थापक तथा आमदार, मेहकर विधानसभा सदस्य यांच्याहस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये l दीपप्रज्वलन व महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आले. यावेळी उद्घाटनाला भास्कर गवई सचिव उत्कर्ष फाउंडेशन यांनी सुद्धा हजेरी लावली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित प्रा. नरहरी राऊत, प्रमुख अतिथी म्हणून प्रोफेसर डॉ. शिल्पा काकडे, संत भगवान बाबा कला महाविद्यालय, सिंदखेडराजा  सीमा तांबेकर, जिजामाता महाविद्यालय यांनी उपस्थिती लावली. 
       यावेळी कार्यक्रमाला प्रा. स्नेहांकिता पुंडकर, स्नेहसंमेलन प्रमुख, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

        स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. विद्यार्थी वर्गाने सादर केलेल्या क्रीडा स्पर्धा (१०० मी. धावणे, ४०० मी. धावणे, गोळा फेक, भालाफेक) रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि इतर कलाकृतींनी उपस्थितांचे मन जिंकले. याशिवाय विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले होते. अध्यक्षांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना कलेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्व आधारित केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या निबंध स्पर्धेच्या परीक्षक प्रोफेसर डॉ. शिल्पा काकडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत कलेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचे मार्गदर्शनही केले. तसेच सहाय्यक प्राध्यापिका सीमा तांबेकर यांनी सुद्धा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेबद्दल गौरवोद्गार काढले. स्नेहसंमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थिनींनी क्रीडा स्पर्धेत घेतलेला मोठ्या प्रमाणात घेतलेला सहभाग राहिला. ज्यामुळे उपस्थितांची मोठ्या प्रमाणावर वाहवा मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वीरेंद्र तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संगीता बावस्कर यांनी मानले.
         उत्साह आनंद आणि प्रतिभेची उधळण करणाऱ्या या स्नेहसंमेलनामुळे उत्कर्ष महाविद्यालयाचा प्रांगण उजळून निघाला.