* व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने बुलढाण्यात आयोजन : औचित्य पत्रकारदिनाचे
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
पत्रकारांची देशातील सर्वात मोठी संघटना असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने गुरुवार ४ जानेवारी २०२४ रोजी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
पत्रकार भवन येथे सकाळी ९ वाजता या शिबिराला सुरुवात होईल. तज्ज्ञ डॉक्टर पत्रकारांसह त्यांच्या परिवारातील सदस्यांची तपासणी करणार आहेत. या शिबिरासाठी उपाशीपोटी (चहा, नाश्ता न करता) उपस्थित राहणे आवश्यक आहे. सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपले आरोग्य निरोगी ठेवावे, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आले आहे. शिबिरानंतरही उपचाराची ज्यांना गरज असेल, त्यांना पुढील सूचना दिल्या जातील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, कार्याध्यक्ष कृष्णा सपकाळ, सरचिटणीस गजानन धांडे व शहराध्यक्ष गणेश निकम यांनी दिल्याचे प्रसिद्धीप्रमुख संदीप वंत्रोले यांनी सांगितले.
* सर्व पत्रकारांनी लाभ घ्यावा : अनिल म्हस्के
व्हॉईस ऑफ मीडिया ही पत्रकार व पत्रकारितेच्या प्रश्नावर काम करणारी संघटना आहे. बुलढाणा शहरातील सर्व पत्रकारांनी कुटुंबासह आरोग्य तपासणीला उपाशीपोटी उपस्थित राहावे, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले आहे.
* सकाळी ११ वाजता सत्कार कार्यक्रम
आरोग्य तपासणी झाल्यानंतर लगेच त्याच ठिकाणी पत्रकार भवन येथे सकाळी ११ वाजता शहरातील ज्येष्ठ पत्रकार व यशश्री मिळवणाऱ्या पत्रकारांचे पाल्य, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार देखील व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात येणार आहे.
