* शेख जहीर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
राज्यातील संपूर्ण अनुदानित शाळा व संस्थेवर सफाई कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी, तसेच शासन निर्णय काढून त्यामध्ये मुस्लीम मेहतर, भंगी, लालबेगी या जातींचा समाववेश करण्यात अशी मागणी शेख जहीर शेख खलील बुलडाणा यांनी ८ जानेवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, संपूर्ण राज्यातील अनुदानित शाळा व संस्थेवर सफाई कर्मचारी यांची कायमस्वरुपी नेमणुक करण्याबाबत तसेच शासन निर्णय काढून त्यामध्ये मुस्लिम मेहतर, भंगी, लालवेगी या जातिची नेमणुक करण्यात यावी, अशी मागणी करत पुढे नमूद असे की, भविष्यातील संपूर्ण जिवन मान बघता व विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता प्रत्येक शाळा व संस्थेवर साफ सफाई करण्यासोबतच परीसर संपूर्ण स्वच्छ ठेवण्याची गरज असते, जेने करुन परीसरात रोगराई पसरणार नाही, यासाठी सफाई कर्मचारी यांची अत्यंत आवश्यकता असल्या कारणाने संपूर्ण राज्यातील अनुदानित शाळा व संस्थेवर एक सफाई कर्मचारी कायमस्वरुपी देण्यात यावा, अशी मागणी एका निवेदनाव्दारे करण्यात आली असून निवेदनावर शेख जहीर शेख खलील यांची स्वाक्षरी आहे.
