बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
बुलडाणा एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी तसेच बुलडाणा आगाराचे कर्तव्य दक्ष डेपो मॅनेजर दिपक भिमराव साळवे हे उच्चविभूशित असून उच्च राहाणी उच्च विचार असलेले व्यक्तीमत्व रा.प. महामंडळात वाहतूक निरिक्षक म्हणून रूजू झाले पण आपल्या बुध्दीच्या व कर्तव्याच्या जोरावर ते स्थानक प्रमुख, आगारव्यवस्थापक या पदावर उत्कृष्ट कामगीरी करून ते आज रोजी बुलडाणा जिल्हा राज्य परिवहन विभागीय वाहतूक अधिकारी (आपराध) ह्या पदावरून ३१ वर्ष रापची सेवा करून सेवानिवृत झाले. दिपक साळवे हे मनमिळावू नेहमी हसतमुख स्वभाव कोणताही प्रवासी असो किंवा कर्मचारी यांचे हसतमुखाने स्वगत करणारे प्रत्येकांच्या अडीअडचणी जाणून घेवून त्यावर तोडगा काढणारा अधिकारी म्हणून त्यांची रा.प. महामंडळात ओळख होती.
महामंडळात विविध जबाबदाऱ्या संभाळतांना त्यांनी घराकडे कधीच दुर्लक्ष केले नाही त्यांचे कडून एक चांगला गुण घेण्यासारखा आहे, आई-वडीलांची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून वागणारा प्रत्यक्षात अंगी उतरून संभाळ करणारा १०० वर्ष वयाचे वडील व ९५ वर्ष वयाच्या आई ह्या दोघांचा लहान मुलासारखी आज पर्यंत सेवा करीत आहे, हा गुण प्रत्येकांनी त्यांचे कडून घेण्यासारखा आहे. नोकरी करून सेवा करणारा मनमिळावू अधिकारी “ प्रवाशांच्या सेवेसाठी “ बहुजन हिताय बहुजन सुखाय हे रापचे ब्रिद वाक्य समोर ठेवून प्रत्येकावर प्रेम करणारे मनमिळाऊ स्वभावाचे, अधिकारी कर्मचारी यांचेसी सुमधूर संबंध जोपासणारे, एसटीवर जीवापाड प्रेम करणारे, जन्म दाते पहीले आई-वडील व दुसरी जन्मदाती एसटी व प्रवासी हे आपले दैवत अन्नदाते समजून वागणारे नावा प्रमाणे दिप तेजत हसतमुख असणारे रापचे दिपक साळवे आपली रापची सेवा करीत आंबेडकरी चळवळीत सक्रीय असत.
एसटी महामंडळात ३१ वर्ष सेवा करून ते सेवेतून निवृत झाले आहे, पण ते समाज सेवेतून निवृत्त झाले नाही. रापची सेवाकरीत असतांना जन्मतःच आंबेडकरी चळवळीची शिकवण आईवडीलांनपासून मिळाल्यामुळे ह्यांनी नोकरी सोबत एसटी महामंडळात बुलडाणा बस्थानकावर पुढाकार घेवून आंबेडकर जयंती इतर महापूरूषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यासाठी हीरारीने भाग घेणारा सर्व सामान्य कर्मचाऱ्या सारखा भाग घेणारा अधिकारी बुलडाणा शहरात आंबेडकरी चळवळीचे कार्यक्रम असतील त्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी अशा कर्तृत्ववान अधिकाऱ्याचा मानसन्मान सत्कार होणे गरजेचे आहे म्हणून एसटी कास्ट्राईब राप कर्मचारी संघटनेचे मा.राज्यउपाध्यक्ष तथा शासनमान्य पत्रकार संरक्षण समीतीचे जिल्हा कार्यध्यक्ष पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी त्याचा छोटेखानी कार्यक्रम आयोजीत करून त्यांना व त्यांच्या प्रत्येक कामात सहभागी असणाऱ्या त्यांच्या पुर्णींगीनी दर्पनताई साळवे यांचा पुष्प गुच्छ, शाल व l भगवान गौतम बुध्दाचा “ बुध्द आणि त्याचा धम्म “ हा ग्रंथ देवून त्यांचा अंतःकरणातून बाबासाहेब जाधव व से.नि. शिक्षण विस्तार अधिकारी विमल जाधव यांनी सत्कार केला.
