महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेचे पत्रकार दिन निमित्त
* बोराखेडी प्रथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळ वाटप
मोताळा : (एशिया मंच वृत्त)
महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनाच्या वतीने 6 जानेवारी 2024 ला पत्रकार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. हा दिवस खऱ्या अर्थाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म हे पत्रकार दिवस म्हणून पत्रकार ह्या दिवशी साजरा करतात.
या निमित्त महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लुकमान शाह यांच्या नेतृत्वात बोराखेडी प्रथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चिंचोले, बोराखडी सरपंच राहुल तेलंग, पत्रकार तानाजी ठोंबरे सर, हनीफ खान, नसीम खान, प्रकाश गंणगे तसेच बोरखेडी आरोग्य प्रथमिक केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
