बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
केंद्रीय कामगार, श्रम, आणि पर्यावरण, वने आणि जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते 6 जानेवारी रोजी खामगाव तालुक्यातील जनुना येथील अटल आनंदवन घन वन वनक्षेत्र परिसरात मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले.
आमदार ॲङ आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार श्वेताताई महाले, अमरावती विभागाचे वनसंरक्षक अमितकुमार मिश्री, बुलडाण्याच्या उपनवसंरक्षक श्रीमती सरोज गवस, खामगावच्या आरएफओ श्रीमती सारिका घेवंदे, माजी आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार विजयराज शिंदे उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 18 जून 2023 रोजी मन की बात कार्यक्रमातून या पद्धतीने वृक्षारोपण करण्याचे वन विभाग आणि नागरिकांना आवाहन केले होते. जनुना बीटमध्ये मियावाकी पद्धतीने पिंपळ, कडूनिंब, जांभूळ, आंबा आणि मोह आदी वृक्षारोपण करण्यात आले असून, आगामी काळात येथे विविध प्रकारच्या 30 हजार वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
