* महिला मेळाव्यास केले मार्गदर्शन
चिखली : (एशिया मंच वृत्त)
परकीय राजवटीच्या गुलामगिरीत आणि कालबाह्य रूढी परंपरांच्या जोखडात गुरफटलेल्या समाजाला परिवर्तनची दिशा देणाऱ्या व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे क्रांतिकारी विचार क्रांतिकारी विचार अमलात आणत नारी शक्तीने आता दारूबंदीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी केले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
मानस फाऊंडेशन व आम्ही चिखलीकर या संस्थेद्वारे आयोजित विधवा, घटस्फोटित, विधुर परिचय व समुपदेशन मेळाव्याचे आयोजन जिजाऊ कॉन्व्हेंट मध्ये येथे ३ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना आमदार महाले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर समुचित प्रकाश टाकला व मेळाव्यास उपस्थित असलेल्या भगिनींना दारूबंदी, महिला सबलीकरण अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले.
* महिलांनी ठाम भूमिका घ्यावी - आ. श्वेताताई महाले
आपल्या अध्यक्ष भाषणात आमदार श्वेताताई महाले पुढे म्हणाल्या की, आपला घर गाडा चालवण्यासाठी व समाजात आपले योगदान देण्यासाठी आता महिलांनी स्वतःच्या बळावर उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांनी आता त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार व हिंसेविरोधी ठामपणे भूमिका घ्यावी तसेच आपल्या परिवाराची काळजी घेत व्यसनाधीन होत चाललेल्या युवा पिढीस योग्य ते मार्गदर्शन करावे असे असे आवाहन देखील आ. श्वेताताई महाले यांनी आपल्या भाषणातून केले.
समाजातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिलांच्या समस्या व त्यांच्या पुनर्विवाहाविषयी दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रा. डी. एस. लहाने यांच्या संकल्पनेतून आयोजित या मेळाव्यास प्रा. नरेंद्र खेडेकर शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख, बी.बी. महामुनी अप्पर पोलीस अधीक्षक, गुलाबराव वाघ पोलीस उपअधीक्षक, पंडितराव देशमुख अध्यक्ष श्रीराम नागरी पतसंस्था, डाॅ. सतेंद्र भुसारी, मनोज दांडगे, सलिम मेमन माजी नगराध्यक्ष, शेख अनिस जिल्हा अध्यक्ष भाजप अल्पसंख्याक आघाडी, डाॅ. प्रकाश शिंगणे, डाॅ. कृष्णकुमार सपकाळ, सुनील पोफळे, दीपक म्हस्के, अंकुशराव पाटील, संग्राम पाटील ठाणेदार, सुधीर चेके पाटील, रामेश्वर डुकरे, अशोक गव्हाणे, राम खेडेकर, सिंधुताई पाटील, शेखर बोंद्रे, आशिष लढ्ढा आदी मान्यवर उपस्थित होते.
