* अनुराधा अर्बनची 2024 ची दिनदर्शिका प्रकाशीत
चिखली : (एशिया मंच वृत्त)
कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांनी स्थापन केलेल्या अनुराधा अर्बन या बॅंकेने जनसेवेचा वारसा कायम ठेवत राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात अत्याधुनिक सुविधा पुरवून ग्राहकांच्या विश्वासास सार्थ ठरविले आहे. शेतकरी, विद्यार्थी, सामान्य नागरीक व व्यावसायीकांकरीता शासकीय व स्थानिक पातळीवरील विविध गरजा लक्षात घेता योजना राबवून अनुराधा अर्बन बॅंकेने नागरीकांना आर्थीक बळकटी देत, बुलडाणा जिल्हयातील सहकार क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटविला असल्याचे वक्तव्य बॅंकेचे उपाध्यक्ष डॉ. विश्वनाथ यादव यांनी केले. याप्रसंगी सन 2024 या दिनदर्शिकेचे विमोचन बॅंकेचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
अनुराधा अर्बन बॅंकेच्या सन 2024 या नववर्षाच्या दिनदर्शिकेचे विमोचन बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याहस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिीत नुकतेच बॅंकेच्या मुख्यालयात करण्यात आले. या दिनदर्शिकेत महाराष्ट्रातील संस्कृती आणी भारतीय सणांच्या माहितीने परीपुर्ण असलेल्या दिनदर्शिकेला सर्वसामान्य नागरीक तथा शेतकरी बांधवाकडुंन शहरी व ग्रामीण भागात माफक प्रतिसाद लाभत आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, उपाध्यक्ष डॉ. विश्वनाथ यादव संचालक, श्री मुंगसाजी माहराज पतसंस्थेचे अध्यक्ष दिपक देशमाने, राष्ट्रवादीचे रवि तोेडकर, शिवसेनेचे श्रीराम झोरे, नंदु क-हाडे, सभापती डॉ. संतोष वानखेडे, नंदुभाऊ सवडतकर, डॉ. सत्येंद्र भुसारी , रामभाऊ जाधव, डॉ. मोहमंद इसरार, निलेश अंजनकर, सुनिल तायडे, रमेश सोनुने, पुरूषोत्तम वायाळ, संपतराव मिसाळ, वर्धमानसेठ डहाळे, नाजिम खासाब, अर्जुनराव डोके, शैलेश भांगडीया, डॉ. अजाराव वसु, पंढरीनाथ टेकाळे, हेमंत शिसोदीया, रिकी काकडे, दिपक वाघ, राजेश खरात, विजय जागृत, जाकीर भाई, अॅड.विलास नन्हई, प्रकाश मेहत्रे, नितीन गुंजाळकर, मंगेश पळसकर, विनोद खरे, समाधान गाडेकर, विनोद पवार, मनोज जाधव, संतोष वाकोडे, सौ. संगिता परीहार, सौ.श्रृती साखळकर, डॉ. प्रतिक्षा वानखेडे, सौ. प्रज्ञा भालेकर, रामभाऊ भुसारी यांच्यासह बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गायकी, संजय चित्ते व अधिकारी, कर्मचा-यांची उपस्थिीती होती.
