राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे जिजामाता प्रेक्षागारावर थाटात उद्घाटन* दीड कोटीच्या बक्षीसाची होणार लय लुट

राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे जिजामाता प्रेक्षागारावर थाटात उद्घाटन
* दीड कोटीच्या बक्षीसाची होणार लय लुट
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
      जिल्ह्याच्या मातीत अनेक दर्जेदार खेळाडू आहेत मात्र त्यांना योग्य संधी मिळत नाही त्यांना प्रोत्साहन मिळत नाही. जिल्हासह राज्याच्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे बुलढाण्याच्या मातीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावे याकरिता मी आपल्या परीने खेळाडूंना पूर्ण मदत उपलब्ध करून देणार आहे. जिल्ह्याच्या खेळाडूंनी जगात लौकिक मिळवावा यासाठी जिल्हास्तरावर अशा प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धाचे वारंवार आयोजन केले जाईल, असे आश्वासन आमदार संजय गायकवाड यांनी दिले.
         बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागार येथे आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करत होते. सदर उद्घाटन सायंकाळी 4 वाजता करण्यात आले. या राज्यस्तरीय स्पर्धेदरम्यान जवळपास तब्बल दीड कोटी रुपयांच्या बक्षिसाची केली जाणार आहे.
       यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, एसपी सुनील कडासने, मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, एडिशनल एसपी बी.बी. महामुनी,  तहसीलदार रुपेश खंडारे, मुख्यधिकारी गणेश पांडे यांच्या सह इतर अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवले आहे. यात तिरंदाजी असो की कुस्ती असो बुलढाणा जिल्ह्यात अनेक दर्जेदार खेळाडू आहेत. ग्रामीण भागातही उत्कृष्ट खेळाडू आहेत मात्र त्यांच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना योग्य असे मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध होत नाही, जिल्हास्तरावर आयोजित अशा राज्यस्तरीय स्पर्धेतून चमकदार खेळाडूंची निवड होऊन त्यांना भविष्यात प्रोत्साहन देण्याचे काम क्रीडा विभागाच्या वतीने केले जाणार आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे याकरिता सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा या तब्बल एक महिना चालणाऱ आहे.

* महिनाभर चालणार स्पर्धा :
      बुलढाणा येथील जिजामाता पेक्षा गार येथे आयोजित असलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा या तब्बल एक महिना चालणार आहेत. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा मध्ये 5000 खेळाडू सहभागी होणार असून तब्बल 50 लाखाच्या वर बक्षीशांशी लूट होणार आहे. 

* विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होणार 
     बुलढाणा येथे आयोजित क्रीडा स्पर्धा मध्ये विशेष म्हणजे महिला क्रीडा स्पर्धा सुद्धा स्वतंत्र घेण्यात येणार आहेत. यासह यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा, क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, खो-खो, फुटबॉल, आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत.