सहकार विद्या मंदिर येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धा* अर्णव गणेश पांडे यांच्या घोष वाक्याने वातावरण देश भक्तिमय

सहकार विद्या मंदिर येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धा
* अर्णव गणेश पांडे यांच्या घोष वाक्याने वातावरण देश भक्तिमय
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       सहकार विद्या मंदिर येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये  वर्ग तिसऱ्यामध्ये असलेला विद्यार्थी अर्णव गणेश पांडे यांनी  क्रांतिवीर शहीद भागतसिंग यांचा पेहराव साकारून या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत अर्णव गणेश पांडे  याने त्याने घातलेल्या पेहरावाचा सादरीकरण करत असताना सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है असे घोषणा देत या घोषणेने  वातावरण देश भक्तिमय झाल्याचे यावेळी दिसून आले.    
     सहकार विद्या मंदिर च्या हॉल मध्ये  ही स्पर्धा आज  ९ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आली. या स्पर्धेत १२५ मुलांनी सहभाग नोंदवुन विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषण साकारून अदाकारीचे सादरीकरण केले. यावेळी असंख्य  विद्यार्थी, मॅडम उपस्थित होत्या.