ट्रक्टर चालका कडून झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी * एआयएमआयएम चे जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

ट्रक्टर चालका कडून झालेल्या अपघाताची  सखोल चौकशी करण्यात यावी 
* एआयएमआयएम चे जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
     दुसरबीड येथील  शेख ईस्माईल शेख इब्राहीम हा ट्रॅक्टरला  ट्रॉली जोडत असतांना ट्रॅक्टर चालक गजानन हरीशचंद्र सुट्टे याने निषकाळजीपणाने शेख ईस्माईल याचा अपघात केला. अपराधाची सखोल चौकशी करून गुन्हा तपासाअंती खारीज करण्यात यावे किंवा अपराधाला ब-समरी करण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद उल मुस्लिमीन संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना निवेदनाद्वारे केली आहे. 
        दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, दुसरबीड येथे ट्रॅक्टर क्र.MH-28-BK-9451 या  ट्रक्टरने शेख ईस्माईल शेख इब्राहीम हा ट्रॅक्टरला ट्रॉली जोडत असतांना ट्रॅक्टर चालक गजानन हरीशचंद्र सुट्टे याने निषकाळजीपणाने  शेख ईस्माईल याचा अपघात केला व शेख ईस्माईल यास उपचाराकरीता दवाखान्यात घेवुन गेले. तेव्हा ट्रॅक्टर  क्र.MH-28- BK-9451 या ट्रॅक्टराचे  मालक कांताबाई सुभाष सोनुने हया तिथे आल्या व त्यांनी शेख ईस्माईल शेख इब्राहीम याच्या ट्रॅक्टरमुळे अपघात झाल्या कारणाने वैद्यकीय उपचाराकरीता खर्च देण्याचे कबुल केले होते. परंतु वेळेवर खर्च न दिल्यामुळे शेख ईस्माईल शेख इब्राहीम यांचे मोठे भाऊ शेख युसुफ शेख इब्राहीम याने अपघाताबाबत पो.स्टे. किनगांव राजा ला तक्रार दिली व त्या तक्रारीवरून अपराध क्र.२९३/२३ कलम २७९, ३३७, ३३८ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यता आला व त्यानंतर कांताबाई सुभाष सोनुने हिने तक्रार करू नका मी तुम्हाला वैद्यकीय उपचाराचा खर्च देते असे सांगितले. परंतु जख्मी शेख ईस्माईल शेख इब्राहीम याचे पोटावर व पोटाच्या बाजुला हाड  तुटल्यामुळे व जबर मार लागल्यामुळे त्याला पुढील उपचाराकरीता औरंगाबाद येथे पाठविने होते. परंतु कांताबाई याने वेळेवर रक्कम दिली नाही. या उलट २७ डिसेंबर रोजीला पो.स्टे. किनगांव राजा येथे जख्मी याचे भाऊ शेख युसुफ शेख इब्राहीम, शेख नौशाद शेख बुढन, शेख मुख्तार शेख जब्बार, शेख अबरार शेख जब्बार, शेख ईमाम शेख रहीम व शेख शकील शेख रहीम, यांच्या विरूध्द जातीचा फायदा घेवुन पो.स्टे.ला अनुसुचीत जाती आणि अनुसुचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ प्रमाणे खोटा गुन्हा जखमीच्या भावांच्या विरोधात दाखल केला. तसेच पो.स्टे. किनगांव येथील तपास अधिकारी यांनी कोणतीही चौकशी न करता गुन्हा दाखल केला आहे. 
      वास्तविक पाहता अनुसुचीत जाती आणि अनुसुचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ अधिनियमानुसार व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या वेळो वेळी अनुसुचीत जातीच्या अधिनियमामध्ये केलेल्या बदलावामध्ये प्राथमिक चौकशी करणे आवश्यक होती व तदनंतर गुन्हा दाखल करणे असा कायदा असुनही तपास अधिकारी याने चौकशी न करता खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. यामुळे पो.स्टे. किनगांव राजा येथे अपराधाची सखोल चौकशी करून गुन्हा तपासाअंती खारीज करण्यात यावे किंवा सदर अपराधाला ब-समरी करणे जरूरी आहे. जेणे करून सामान्य लोकांना न्याय द्यावा अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन बुलडाणा जिल्हा अध्यक्ष डॉ. मोबीन खान यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आली आहे.