दलाई लामांच्या उपस्थितीतील धम्म परिषद पुढे ढकलली * तारीख लवकरच जाहीर होणार : सतीश पवार यांची माहिती

दलाई लामांच्या उपस्थितीतील धम्म परिषद पुढे ढकलली 
* तारीख लवकरच जाहीर होणार : सतीश पवार यांची माहिती
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
          शहरात १ व २ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केलेली जागतिक धम्म परिषद व बिझिनेस एक्स्पो काही कारणास्तव पुढे ढकलला आहे. दलाई लामा यांच्या उपस्थितीत होणारी परिषद लामा यांची तारीख निश्चित होताच जाहीर केली जाईल, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सतीश पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
          बुलढाणा येथे १ व २ जानेवारी २०२४ रोजी धम्म परिषद व बिझिनेस एक्स्पो दलाई लामा यांच्या प्रमुख उपस्थिती आयोजित केला होता. त्या दृष्टीने समाजबांधवांनी तयारी चालविली होती. मात्र, दलाई लामा यांचा दौरा काही कारणास्तव पुढे ढकलावा लागला. यामुळे जानेवारीतील आयोजन काही काळ लांबणीवर टाकावे लागल्याचे सतीश पवार यांनी सांगितले. दलाई लामा यांचा मातृतीर्थ जिल्ह्याचा दौरा जाहीर होताच आयोजनाची तारीख ठरवली जाईल, असे पवार यांनी म्हटले आहे.