* ग्रा.प सदस्य लुकमान शाह यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी
मोताळा : (एशिया मंच वृत्त)
तालुक्यातील ग्राम कोथळी येथे आठवड्यातुन एक दिवस पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी लुकमान शाह उस्मान शाह ग्रामपंचायत सदस्य यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती मोताळा यांच्या कडे शुक्रवार 29 डिसेंबर 2023 रोजी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, ग्राम कोथळी हे गाव मोताळा तालुक्यात असलेल्या लोकसंख्येने मोठ्या गावा पैकी एक गावं आहे. कोथळी पासुन मोठ्या प्रमाणावर खेडे गाव समान अंतरावर आहेत. कोथळी व परिसरातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेती असल्याने बहुतांश शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पशुधन उपलब्ध असल्याने आठवड्यातुन एक दिवस कोथळी येथे पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध देण्यात यावा. जेणे करून शेतकऱ्यांना आपलं पशुधन पशुवैद्यकीय अधिकारी यांना दाखवण्यासाठी मोताळा येथे खर्च करून येण्याची गरज भासणार नाही. कोथळी येथे पशुवैद्यकीय अधिकारी आठवड्यातुन एक दिवस उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना होणाऱ्या मनस्तापातुन त्याची सुटका होईल. तरी आठवड्यातुन एक दिवस कोथळी येथे पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाच्या अंती करण्यात आली आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य लुकमान शाह उस्मान शाह याची स्वाक्षरी आहे.
