बुलढाणा येथे विधवा परित्याग महिला परिषदेचे आयोजन

बुलढाणा येथे विधवा परित्याग महिला परिषदेचे आयोजन
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
      विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, त्यांच्या संदर्भातील अनिष्ट रुढी-परंपरा,विधवांकरीता असलेल्या शासकीय योजनांची माहिती व रोजगार या संदर्भात मार्गदर्शन तसेच शासनाची विधवांसंदर्भातील भूमिका व त्यांचे पुनर्वसन यावर चर्चा करण्यासाठी "विधवा-परित्यक्ता महिला परिषदेचे " 10 डिसेंबर 2023, रविवार रोजी सकाळी ११ वाजता शिवसाई ज्ञानपीठ, तुळशी नगर, बुलढाणा येथे आयोजन करण्यात आले आहे.
         कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री अन्न व औषध प्रशासन आ.डॉ. राजेंद्र शिंगणे तर कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील राहणार आहे. कार्यक्रमात विधवा-परित्यक्ता महिलांचे मानसिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करणे, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता महिला, विधवा महिलांचे आई-वडील, सासु-सासरे, विधवा महिलांची मुले-मुली, पत्रकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, विधवा महिलांच्या समस्यांची जाण असणारे व ती सोडविण्याची इच्छा असणारे  सहभागी होवू शकते. बैठक व्यवस्थेच्या नियोजनार्थ सहभागी होवू इच्छिणाऱ्या व्यक्तीनी मो. क्र. 8554988752 वर संपर्क करून नाव नोंदवावे. असे आवाहन आयोजक माजी जि.प. सदस्य तथा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणाचे डी.एस.लहाने, शिवसाई परिवारच्या वतीने करण्यात आले आहे.