व्हॉइस ऑफ मीडिया ऊर्दू विंग बुलढाणा जिल्हा कार्यकारणी जाहीर

व्हॉइस ऑफ मीडिया ऊर्दू विंग  बुलढाणा  जिल्हा कार्यकारणी जाहीर 
मलकापूर :  (एशिया मंच वृत्त)
         रोजी व्हॉईस ऑफ मिडिया (ऊर्दु विंग)चे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारुण नदवी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच व्हॉईस ऑफ मिडिया ( ऊर्दू विंग)ची जिल्हा कार्य करणी जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्ष  जफर खान, जिल्हा उपाध्यक्ष  सैय्यद वसीम,  जिल्हा सचिव  निसार शेख,  सह सचिव  जियाउद्दीन काझी यांच्या सह जिल्हा कार्यकरणी जाहीर करण्यात आली.
      व्हॉईस ऑफ मीडिया (उर्दू विंग) चे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारुण नदवी यांनी जिल्हा कार्यकरणीतील नव नियुक्त पदधिकऱ्यानां नियुक्तीपत्रे देताना म्हणाले की, केवळ नियुक्तीपत्र घेतले की आता बस झाले,  हा आमचा उद्देश नाही,  प्रत्येक नागरिकांसाठी पत्रकार बांधवानीं नागरिकांच्या हिताचे उपक्रम जास्तीत जास्त राबवावे असे म्हणाले. 
       पुढे बोलताना मुफ्ती हारुण नदवी म्हणाले की, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक संदीप काळे सरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासोबतच व्हॉईस ऑफ मीडियाचे उद्दिष्ट पुढे नेण्यासाठी त्यांना शक्य तेवढी मदत करायची आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.