* आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्याकडे छोटू कांबळे यांची मागणी
चिखली : (एशिया मंच वृत्त)
शहारातील प्रभाग क्र. 5 मधील शेत सर्व्हे क्रमांक 98 मधील आरक्षण क्र. 72 शासकीय मुलींचे वस्तीगृह व 17 शासकीय निवासस्थाने या जागेवरील आरक्षण वगळून स्थानिकांना प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिवेशनात मंजूरी घ्यावी, अशी आग्रही मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्याकडे एका 6 डिसेंबर 2023 रोजी निवेदनाद्वारे छोटू कांबळे यांनी केली.
दिलेल्या निवेदनात नमूद की, चिखली शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील शेत सर्व्हे क्रमांक 98 मधील आरक्षण क्रमांक 72 शासकीय मुलींचे वस्तीगृह व 17 शासकीय निवासस्थाने ही आरक्षणे या आरक्षणे भाग 2 वगळून रहिवाशी क्षेत्रात समाविष्ट करण्यातबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधियिमन 1966 चे कलम 37 अन्वये फेरबदलाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. शासनाने आय.एच.एस.डी.पी. योजने अंतर्गत सदर ठिकाणी घरकुलाचा प्रस्ताव मंजूर झालेला होता. तरी शासनाच्या सध्याच्या ध्येयधोरणानुसार सदर घरकुले मंजूर होण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रस्तावीत केलेले आहे. तरी शेत सर्व्हे क्रमांक 98 मधील आरक्षण क्र. 72 शासकीय मुलींचे वस्तीगृह व 17 शासकीय निवासस्थाने या जागेवर राहत असलेल्या नागरीकांना प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी हिवाळी अधिवेशनात मंजूरी घेण्यात यावी अशी मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्याकडे छोटू कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली.