मुस्लीम शाह फकीर संघटनेचा नागपूर विधिमंडळावर इशारा मोर्चा* बुलढाणा जिल्ह्यातील मुस्लीम शाह समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चा आंदोलनात सहभागी व्हावे- के.जी.शाह

 मुस्लीम शाह फकीर संघटनेचा नागपूर विधिमंडळावर इशारा मोर्चा
* बुलढाणा जिल्ह्यातील मुस्लीम शाह समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चा आंदोलनात सहभागी व्हावे- के.जी.शाह
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
       राज्यातील मुस्लीम शाह फकीर जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात राज्य शासनाने करावा, या मागणीसाठी मुस्लीम शाह फकीर संघटना सन 2019 पासून सातत्याने ही मागणी लावून धरीत असून या संदर्भात जिल्हयासह राज्यात शेकाडो आंदोलने करण्यात आली. मागील हिवाळी अधिवेशनात  22 डिसेंबर 2022 रोजी हजारोच्या संख्येने विधानभवनावर आक्रोश मोर्चा आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सामाजिक न्यायमंत्री अतुलजी सावे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे संघटनेच्यावतीने 14 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे विधान भवनावर इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे.

          सदर मोर्चा यशवंत स्टेडियम येथून दुपारी 12 वाजता मोर्चा आंदोलनास सुरुवात होणार आहे. सदरच्या मोर्चास मुस्लीम शाह फकीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मार्गदर्शन करणार असून या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे प्रदेश अध्यक्ष लुकमान उस्मानशाह हे करणार आहेत. सदरचा इशारा मोर्चा राज्य सरकारला समाजाच्या प्रमुख मागणीसाठी आहे. पुढील काळामध्ये राज्य सरकारने लवकरच मुस्लीम शाह फकीर जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गामध्ये न केल्यास तिव्र स्वरुपाचे राज्यव्यापी आंदोलन संघटनेच्या वतीने सुरु करण्यात येईल, हा इशारा देण्यासाठी व आपल्या न्याय हक्कासाठी दि. 14 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता नागपुर येथील यशवंत स्टेडियम येथुन इशारा मोर्चा आंदोलनास सुरुवात होईल. हा मोर्चा नागपुर विधानभवनावर हजारोच्या संख्येने धडकणार असून राज्यातुन हजारोच्या संख्येने मुस्लीम फकीर समाज बांधव नागपुरच्या दिशेने निघणार आहेत. 
      बुलढाणा जिल्ह्यातील मुस्लीम फकीर समाज बांधवांनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मुस्लीम शाह फकीर समाज संघटनेचे महासचिव जाकीरशाह, प्रभारी विदर्भ प्रमुख रहिम मकबुल शाह, अकील शब्बीरशाह, विदर्भ प्रमुख युवा आघाडी, संघटनेचे बुलढाणा जिल्हा प्रमुख तेहसीनशाह, सईदशाह जिल्हाध्यक्ष युवा आघाडी, मन्सुरशाह महासचिव युवा आघाडी, नजीरशाह जिल्हा संपर्क प्रमुख युवा आघाडी, इरफानशाह शहर अध्यक्ष युवा आघाडी बुलढाणा, हसनशाह शहर उपाध्यक्ष युवा आघाडी बुलढाणा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.