खामगावच्या विराट सभेत ; पुन्हा एकदा मराठ्यांची वज्रमूठ * आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही : मनोज जरांगे पाटील

खामगावच्या विराट सभेत ; पुन्हा एकदा मराठ्यांची वज्रमूठ  
* आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही : मनोज जरांगे पाटील
खामगाव : (एशिया मंच वृत्त)
      सरसकट मराठा आरक्षणाची मागणी मांडून आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे संपुर्ण महाराष्ट्रात सभा घेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सभा आटोपून जरांगे खान्देश आणि विदर्भात आले. ४ डिसेंबर रोजी सोमवारी  खामगांव शहरातील नगर परिषदेच्या प्रांगणात जरांगे यांची विदर्भातील पहिली सभा पार पडली. उशिरा सुरू झालेल्या सभेत मराठा बांधवांना संबोधित करताना जरांगे म्हणाले, विदर्भातील मराठा एक येत नाहीत, अशी वार्ता आमच्या मराठवाड्यात काहींनी पसरवली. 'विदर्भातील मराठा एक येत नाहीत अस म्हणणाऱ्यांनीं खामगावात येऊन पहावं असा प्रतिवाद जरांगे यांनी यावेळी केला.
खानदेश - विदर्भातील बहुतांश मराठा बांधव ओबीसी प्रवर्गातील आहेत. त्यामुळे तुम्हाला जरी आरक्षण असलं तरी उर्वरित महाराष्ट्रातील लेकरं सुद्धा तुमचेयं.. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव ठिकठिकाणी एकत्रित होत आहे. प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठ्यांची वज्रमूठ पहायला मिळत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी नाव न घेता ना. भुजबळ यांच्यावर देखील निशाणा साधला. ओबीसींचा नेता म्हणून घेणारा आपल्यात ओबीसीच्या नावाखाली फूट पाडायचा प्रयत्न करतोय असा आरोप जरांगे यांनी भुजबळांवर लगावला.
       जरांगे पाटील पुढे म्हणाले की, विदर्भातील व खानदेशातील  मराठ्यांनी टाकत दाखवून दिली, तर आरक्षणाशिवाय  मराठ्यांच्या मुलांचे आयुष्य आणि भविष्य उध्वस्त झाले, आता मराठ्यांना लेकरांच्या वेदना  सहन होत नाही, तसेच आता कशा सापडल्या 32 लाख नोंदी, ओबीसीच्या नावाखाली आपल्यात फूट पाडण्याचे प्रयत्न होत आहे, हा संघर्ष आपण न्यायासाठी  उभा केला आहे, असेही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी विराट जनसभेला संबोधित करताना सांगितले.