कर्मचाऱ्यांचे अन्यायकारक निलंबन मागे घ्या ; अन्यथा सीईओंच्या दालनात ठिय्या* वंचित युवा आघाडीचा सीईओंना सात दिवसांचा अल्टिमेटम

कर्मचाऱ्यांचे अन्यायकारक निलंबन मागे घ्या ; अन्यथा सीईओंच्या दालनात ठिय्या
* वंचित युवा आघाडीचा सीईओंना सात दिवसांचा अल्टिमेटम
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)

      ग्रामविकास अधिकारी व शिक्षकावर केलेली निलंबनाची अन्यायकारक कारवाई मागे घ्यावी; अन्यथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी दिला आहे.
       .निलंबन मागे घेण्याकरिता 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, तसे निवेदन वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने देण्यात आले आहे. निवेदन देताना जिल्हा संघटक बाला राऊत, जिल्हा महासचिव अर्जून खरात, विधि सल्लागार ॲड. एस.एस. सुरडकर, जी.एस. गवई, जि.प. सर्कलप्रमुख अनिल पारवे उपस्थित होते.
         काही दिवसांपूर्वी ग्रामविकास अधिकारी ज्योती मगर व शिक्षक रविकांत जाधव यांच्यावर बेकायदेशीररित्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. सदरील कर्मचारी निष्कलंक आहेत. त्यांच्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे आरोपदेखील झाले नाहीत. त्यांची बाजू ऐकून न घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या दबावात येऊन घाईघाईत ही कारवाई केल्याचा आरोप सतीश पवार यांनी केला आहे. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करून निलंबनाची कारवाई रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या 7 दिवसांमध्ये सकारात्मक भूमिका घ्यावी; अन्यथा संविधानिक मार्गाने 6 डिसेंबर रोजी सीईओंच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सतीश पवार यांनी दिला आहे.