मेहकर : (एशिया मंच वृत्त)
वकील संघाच्या वतीने संविधान दिवस मेहकर जिल्हा सत्र न्यायालयात अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधीश चंदगडे यांच्या हस्ते सर्वप्रथम संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायधीश मुंगीलवार, दिवाणी न्यायालयाचे वरिष्ठ न्यायधीश शेख, दिवाणी न्यायालयाच्या मा. कनिष्ठ न्यायधीश थोरात मॅडम. आणि मा. न्यायधिश जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी न्यायाधीश चंदगडे यांच्या हस्ते मेहकर वकील संघाच्या ग्रंथालयाला संविधान पुस्तिका देण्यात आली. ॲड.विष्णू सरदार यांनी आपल्या भाषणातून भारतीय संविधान हे जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान आहे. भारत देश हा विविध जातीं व धर्माचा आहे. व संविधानामुळे ७५ वर्ष हा देश धर्माचा व विविध भाषांचा असताना सुद्धा फक्त संविधानामुळे एक संघ राहिला. प्रत्येकाला समान न्याय देण्याचे काम केले असून या संविधानाची गरिमा व रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. निखिल मिटकरी, उपाध्यक्ष ॲड.संदीप वाघमारे, सचिव ॲड. समाधान कटारे व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. अनिल अशोक अडेलकर, ॲड.अमोल देशपांडे, ॲड. संदीप गवई, ॲड. के.जी.सदार, ॲड. राजेश दाभाडे, ॲड. सुबोध जाधव यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. संजीव नवघरे यांनी केले तर आभार ॲड.रजत मेहकरकर यांनी मानले तसेच संविधान प्रस्तावनेचे वाचन करून सविधान दिनाच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.