लोणार : (एशिया मंच वृत्त)
लोणार शहराचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात व आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून लोणार नगरपरिषद अंतर्गत विविध विकास कामासाठी जवळपास 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्राध्यापक बळीराम मापारी यांनी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.
मागील एक महिन्यापूर्वी लोणार शहरांमध्ये आमदार रायमुलकर आले असता जैन बांधवांनी त्यांची भेट घेतली होती व त्यांना समाजाच्या हितासाठी निधीची मागणी केली होती त्या मागणीची दखल घेत त्यांनी जैन समाजाच्या ताब्यात असलेल्या 5 एकर गौरक्षण जागे करिता दोन कोटी 85 लाख 36 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, यांनी ती मध्ये संपूर्ण 7 एकर जागेला वॉल कंपाऊंड करण्यात येणार आहे तसेच आत मधील जागेमध्ये सर्व सुविधा युक्त 4 रूम बांधण्यात येणार आहेत. या गौरक्षण जागे पासून मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी सिमेंट काँक्रीट चा रोड बांधण्यात येणार आहे तसेच स्वर्गीय वंजारी समाज आणि मानलेली दैवत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या नावाने तहसील कार्यालय जवळ असलेल्या चौकात भव्य प्रवेशद्वार बांधण्यात येणार आहे. या कामासाठी 60 लक्ष 80 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
लोणार शहराच्या सौंदर्यकरणांमध्ये वाढ व्हावी व जगभरातील पर्यटक या ठिकाणी आकर्षित व्हावे म्हणून या कामासाठी 1 कोटी 50 लाख 81 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरातील मुख्य चौक याचे सौंदर्यीकरण या निधीमधुन करण्यात येणार आहे. लोणार शहरातील जवळपास सर्व समाजासाठी सभामंडप खासदार जाधव, आमदार रायमुलकर यांनी मंजूर केले आहेत. या अगोदर सुद्धा बैल बाजार जवळ बाळासाहेब ठाकरे प्रवेश व्दारासाठी व मंठा बायपास या ठिकाणी कमळजा माता पूर्वी प्रवेश द्वारासाठी निधी देण्यात आला आहे, अशी माहिती प्राध्यापक मापारी यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.
मी मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. मी नगराध्यक्ष तसेच अनेक पदे भूषवलेली आहेत परंतु आजपर्यंत एवढा निधी लोणार शहरासाठी मेहकर मतदारसंघासाठी मिळाला नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाचे सूत्रे एकनाथरावजी शिंदे यांनी स्वीकारल्यापासून मतदारसंघाला कोट्यवधी रुपयांचा निधी खासदार जाधव यांच्या मार्गदर्शनात आमदार रायमुलकर यांनी सत्तेच्या माध्यमातून खेचून आणला आहे तरी कोणीही विकास कामांमध्ये पक्षीय जातीय राजकारण करून विकासात खोडा घालू नहे व विकास करून घ्यावा असे आव्हान प्राध्यापक मापारी यांनी केले आहे.
