* समृद्धीवर महामार्गावरील घटना
सिं.राजा : (एशिया मंच वृत्त)
समृद्धी महामार्गावर फर्दापूरनजीक भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातामध्ये १ गंभीर जखमी झाला असून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात १८ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान घडला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे येथील विभाकर मिश्रा आणि त्यांचा परिवार हा एमएच-२३ बीएच-३७७६ क्रमांकाच्या वाहनाद्वारे नागपूर येथे जात होता. दरम्यान चैनेज क्रमांक २९० जवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या क्रॅश बॅरियरला धकले. त्यात चालक विभाकर मिश्रा (५०) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पायालाही भंगीर इजा झाली आहे. त्यांना त्वरित महामार्ग पोलिसांनी मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. या वाहनामध्ये असलेल्या दिव्या विभाकर मिश्रा या किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्या सोबत असलेल्या रितेश मिश्रा (६) आणि आयुष मिश्रा (३) हे सुखरूप असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पीएसआय शैलेश पवार व त्याचे सहकारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी जखमींना मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली.
