वडनेरजवळ भरधाव खासगी बसची दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यू

वडनेरजवळ भरधाव खासगी बसची दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यू     
नांदुरा : (एशिया मंच वृत्त)
     भरधाव खासगी बसने राष्ट्रीय महामार्गवर वडनेर भोलजी नजीक पुलाजवळ दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली. राष्ट्रीय महामार्गावर वडनेर गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वडनेर जवळ एआर 01.ज.7741 क्रमांकाच्या खासगी बसने एम एच 28 बीएस 7821 क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. खासगी बसने धडक दिल्याने भीषण अपघात होऊन या अपघातात दुचाकी वरील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतक जळगाव खानदेश जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.
या अपघाताची माहिती मिळताच मदतीसाठी ओम साई फाउंडेशन व नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत घटनेची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशन रुग्णवाहिका सह घटनास्थळी पोहोचून अपघात मृत पावलेल्या मोटरसायकल स्वाराना नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. घटनास्थळी विलास निबोळकर, कृष्णा नालट अश्विन फेरण राजु बगाडे आदींनी धाव घेतली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.