*कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच
*संदीप शेळके यांचा आंदोलना पाठिंबा
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
शासकीय सेवेत कायम करा या मागणीसाठी आरोग्य विभागातील हजारो कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करित आहे. गेल्या 25 ऑक्टोंबर पासून राज्यात काम बंद आंदोलन सुरु आहे , ग्रामीण भागातील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे , तरीही सरकारला जाग येत नाही म्हणून जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
दिवाळी हा सण सुरू असतानाही ते आरोग्य कर्मचारी आजही गेल्या 19 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहे.
दीपावलीचा सर्वात महत्वाचा दिवस लक्ष्मीपूजन असून या दिवशी आंदोलनस्थळी 12 नोव्हेंबर रोजी वन बुलढाणा मिशनाचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या नेतृत्वात ठेचा भाकर खाऊन सरकारचा तीव्र निषेध नोंदविला आहे. तसेच वन मिशन बुलढाणा चे संदीप शेळके यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. जोपर्यत सेवेत कायम करून घेत नाही तोपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. यावेळी संदीप शेळके यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की, मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, सोबतच वन मिशन बुलढाणा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
