* समाज उन्नतीसाठी महिलांचा सन्मान करा-- जिल्हाधिकारी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
घरातील महिलेवर कुटुंब अवलंब असते. कुटुंबाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या महिलांचा मान सन्मान केला पाहिजे. जो समाज स्त्रियांचा आदर, सन्मान करतो तो समाज प्रगतीच्या दिशेने जातो. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी केले.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने पोस्ट कोविड नंतर उद्भवणाऱ्या समस्यांवर निदान व उपचारासाठी आरोग्यम् धनसंपदाचा जागर घातला जात आहे. आज वसंतप्रभा प्रतिष्ठान चिंचोले नर्सिंग कॉलेज बुलढाणा येथे जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी आरोग्यम ॲपचे लोकार्पणही जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आरोग्य संचालक डॉ. वसंतराव चिंचोले होते. तर कार्यक्रमास शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. शोण चिंचोले, सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ, दैनिक महाभूमीचे मुख्य संपादक सुरेश देवकर, डॉ. दीपक लधड, डॉ. गजानन पडघान, डॉ. भागवत भुसारी, डॉ.चंद्रकिरण पवार, डॉ. गजेंद्र निकम, डॉ. अजित शिरसाठ, डॉ. शरद जुमडे, डॉ. किनगे, डॉ. दुर्गासिंग जाधव, डॉ.अजित शिरसाट, गजानन शिंदे, डॉ. वैशाली पडघान, डॉ. माधवी जवरे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांची उपस्थिती लाभली. तर शिवजयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट जयसिंगराजे देशमुख प्रा.अनिल रिंढे,सागर काळवाघे, प्राचार्य विष्णूपंत पाटील, डॉ. सदानंद देशमुख, डॉ. अशोकराव खरात,पत्रकार गणेश निकम केळवदकर, डॉ. मनोहर तुपकर, गोपालसिंग राजपूत,वर्षा ताई सोनोने,अमोल रिंढे,संजय खांडवे यांची उपस्थिती लाभली.
प्रास्ताविक डॉक्टर शोण चिंचोले यांनी केले. बुलढाणा येथे कोविड नंतर उद्भवणारे आजारावर शिवजयंती कार्य करीत आहे. हा उपक्रम आगळावेगळा असून उद्या राज्यात आणि देशासाठी प्रेरणादायी ठरेल असे डॉ शोण म्हणाले. पोस्ट कोविड नंतरच्या समस्या निवारणासाठी कौन्सिलिंग व उपचारासाठी तयार करण्यात आलेल्या अँप ची माहिती त्यांनी यावेळी दिली. डॉ. गजानन पडघान,डॉ. दीपक लधड यांनीही विचार मांडले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीला सृजन व सज्जन चेहरा डॉ.शोण चिंचोले व सुनील सपकाळ यांचे रूपाने लाभला असा गौरवपूर्ण उल्लेख डॉक्टर लद्धड यांनी करून शिवकार्यास शुभेच्छा दिल्या.
* जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते निकम व खरात सन्मानित
जिल्हा बँकेचे सिइओ डॉ. अशोकराव खरात व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर गणेश निकम केळवदकर यांचा जिल्हाधिकारी पाटील यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला. जिल्हा बँकेला पूर्व पदावर आणण्यासाठी डॉक्टर खरात करीत असलेल्या कार्याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. त्यांना सहकार क्षेत्रातील मानाचा पुरस्कार नुकताच देण्यात आला. गणेश निकम हे सामाजिक ,साहित्यिक , प्रबोधन चळवळीत कार्य करणारे अग्रेसर नाव आहे. याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी दोघांना सन्मानित केले.
* जिल्हाधिकारी म्हणाले ही तर पवित्र भूमी
जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. रायगडला सीईओ असताना जिजाऊंच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी जायचो. रायगड वरून आपण जिजाऊंच्या भूमित म्हणजे बुलढाणा जाऊ असा कधी विचार केला नव्हता. ही भूमी जिजाऊंच्या जन्मगाव असल्याने वंदनीय व पवित्र असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. येथे साजरी होणारी शिवजयंती बद्दल ऐकले होते. आज प्रत्यक्ष काम पाहता आले. सर्व घटकांचा सहभाग पाहून आनंद वाटल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. या कार्यक्रमात बुलढाणा शहरातील नामवंत डॉक्टर, शिवप्रेमीची उपस्थिती लाभली. संचलन डॉ.माधवी जवरे तर आभार प्राचार्य सुनील जवंजाळ यांनी मानले.
