वन बुलढाणा मिशनचे उद्या जिल्ह्यात डफडे बजाव* विजेच्या समस्यांबाबत महावितरण कार्यलयांवर देणार धडक

वन बुलढाणा मिशनचे उद्या जिल्ह्यात डफडे बजाव
* विजेच्या समस्यांबाबत महावितरण कार्यलयांवर देणार धडक
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
      वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनात ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील महावितरण कार्यालयांसमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात येणार आहे.
      विजेच्या विविध समस्यांबाबत वन बुलढाणा मिशनच्यावतीने बुलढाणा, चिखली, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, मोताळा येथील महावितरण कार्यालयावर डफडे बजाब करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा नियमित १२ तास वीज पुरवठा सुरु ठेवा, ट्रान्सफार्मर जळाल्यास नवीन ट्रान्सफार्मर उपलब्ध करा, दिवाळीत गाव, शहरांमधील वीजपुरवठा खंडित होऊ देऊ नये, लोडशेडिंग करु नये आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.