हिंगोली येथे राज्यस्तरीय आंध आदिवासी कर्मचाऱ्याचे अधिवेशन * मोठ्या संख्येने उपस्थित हजर राहण्याचे प्रदेशाध्यक्ष नंदिनीताई टारपे याचे अवहान

हिंगोली येथे राज्यस्तरीय आंध आदिवासी कर्मचाऱ्याचे अधिवेशन
 * मोठ्या संख्येने उपस्थित हजर राहण्याचे प्रदेशाध्यक्ष नंदिनीताई टारपे याचे अवहान
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      महाराष्टतील पैनगंगेच्या खोऱ्यात आंध जमात मोठ्या प्रमाणात असून प्रामुख्याने विदर्भ मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात आंध समाज वास्तव्यास आहे, भारतीय राज्यघटनेत आदिवासीना शासकीय सेवेत व राजकीय आरक्षण दिले आहे. आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी अधिवेशनाच्या माध्यमातून संघटित होऊन भविष्यातील न्यायासाठी ऐकत्र येणे काळाची गरज आहे. त्याचं अनुषंगाने आंध आदिवासी कर्मचार्याचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन मराठवाड्यातील हिंगोली येथे  11 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता स्थळ साई रिसॉर्ट, अकोला बायपास हिंगोली येथे आयोजित करण्यात आले आहे.
            या  अधिवेशनात विविध मागण्यासह तसेच  हक्काच्या पदोन्नती आरक्षणसाठी आपण आपल्या न्यायासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अधिवेशनासाठी  हिंगोली येथे मोठ्या संख्येने आंध आदिवासी कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे अवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष नंदिनीताई टारपे यांनी केले आहे.
             या कार्यक्रमाच्या उदघाटक माजी सामाजिक न्याय मंत्री  शिवाजीराव मोघे हे राहणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव कुरुडे माजी जिल्हाध्यक्ष , आंध आदिवासी कर्मचारी संघटना हिंगोली, प्रमुख अतिथी  उत्तमराव इंगळे , माजी आमदार संतोषजी टारफे, माजी जि.प.अध्यक्ष गणाजी बेले तसेच केशवराव इंगळे अध्यक्ष सिद्धेश्वर संस्थान, पटनापूर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक दिनकर पावरा , सहाय्यक आयुक्त ठाणे  सुनील लोखंडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे, श्रीमती शिल्पा पवार वरिष्ठ कोषागार अधिकारी आमवती, कार्यक्रमाचे स्वागतध्यक्ष दत्ता नांदे जिल्हाध्यक्ष, आंध आदिवासी कर्मचारी संघटना, हिंगोली प्रमुख उपस्थितिमध्ये आंध आदिवासी समाजाचे आजी, माजी अधिकारी राहणार आहेत.