आरोग्यम धनसंपदा"  मोहिमेचे जिल्हाधिकारी यांच्याहस्ते 10 नोव्हेंबर रोजी होणार उद्धाटन    
* शिव जयंती उत्सव समितीचे आयोजन
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
       कोरोना झालेल्या रुग्णांच्या शरीरावर होत असलेल्या आजाराचे प्रमाण हे वाढत आहे. यावर विशेष योजना म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेनें होऊ घातलेल्या शिव जयंती उत्सव समिती २०२३ मार्फत "आरोग्यम धनसंपदा " या मोहिमेचे  उद्धाटन धनयोत्रोदशीच्या आरोग्यदायी पर्वावर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते १० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता वसंतप्रभा कॉलेज ऑफ नर्सिंग. हाजीमलंग दर्गा च्या मागे, चिखली रोड, बुलडाणा येथे  होणार आहे.
      या मोहिमेत सर्व पॅथीचे / वैदयकिय क्षेत्रातील सर्व तज्ञ मंडळींचे विशेष सहकार्य लाभणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन, फिजिओथेरपी असोसिएशन, युनानी असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, कोरोना नंतर उद्भवणाऱ्या अनेक शारीरिक व्याधी मानसिक आरोग्य, हृदयविकाराचे वाढलेले प्रमाण, वजन वाढणे, मधुमेह अस्थमा व दमा यांचा त्रास, शरीरावर होत असलेले संधिवाताचा परिणाम व शरीराच्या इतर अवयवावर होत असलेले परिणाम, जनजागृती मोहीम हि सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या सहकार्याने पार पडणार आहे. 
      या जनजगृती मोहिमेमध्ये विशेष सहकार्य म्हणून पत्रकार बांधव, प्रिंट मीडिया व इलेक्ट्रानिक मीडिया,  इलेक्ट्रानिक माध्ये, फेसबुक लाईव्ह, युट्युब चॅनल, स्थानिक केबल नेटवर्क, पथनाट्य, सामाजिक / धर्मादाय संस्था या जनजागृती मोहिमे मध्ये आमंत्रित आहे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. शोण चिंचोले, सचिव प्रा. सुनील सपकाळ व सार्वजनिक शिव जयंती उत्सव समिती बुलडाणा यांनी केले आहे.