वायुप्रदुषण नियंत्रणासाठी एक प्रयत्न - राधेश्याम चांडक

वायु प्रदुषण नियंत्रणासाठी एक प्रयत्न - राधेश्याम चांडक
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       सध्या संपुर्ण जग विविध कारणांनी निर्माण होणाऱ्या प्रदुषणांचा सामना करीत आहे. या प्रदुषणामुळे वातावरणात बदल झाला असून निसर्गचक्र बदललेले दिसुन येते, त्यासाठी जागतीक पातळीवर प्रयत्न केले जात आहे. प्रदुषणाचे एक कारण वायु प्रदुषण हे ही आहे. विविध कंपन्यामधील चिमणीमधुन निघणारा धुर तसेच वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे वाहनातील निघणारा धूर यामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदुषण होत आहे. यासाठी शासन स्तरावरुन ई-व्हेईकलचा पर्याय शोधला असुन त्यासाठी मोठ्या प्रमाणात ई-व्हेईकलसाठी वाहनधारकांना प्रोत्साहीत केले जात आहे.
     त्याचाच एक भाग म्हणून बुलडाणा अर्बन बुलडाणा शहरातील वायु प्रदुषण कमी व्हावे यासाठी ई-ऑटोरिक्षा फायनान्स करीत आहे, ई-ऑटोरिक्षा एका चार्जमध्ये ८० ते १०० कि.मी चालते. इलेक्ट्रीक चार्जंग दर कमी असल्यामुळे ऑटोरिक्षा चालक कमी दराने प्रवासी वाहतुक करतील परिणामी लोकांनाही त्याचा फायदा मिळेल. यास्तव संस्थेने प्रायोगीक तत्वावर १०० अॅटोरिक्षा सवलतीच्या व्याजदराने देण्याचे ठरविले असुन या ई-रिक्षांची किंमत १,५०,००० पासुन २,५०,०००  रुपयापर्यंत आहेत. ज्या अॅटोरिक्षा चालकांना या अॅटो खरेदी करावयाच्या असतील त्यांनी संस्थेच्या बुलडाणा शहरातील कोणत्याही शाखेत संपर्क साधुन साधा अर्ज सादर करावा.
      या कर्ज प्रकरणात संस्था ८०% पर्यंत कर्ज उपलब्ध करुन देईल. सदर कर्ज तिन-तिनच्या गटात वितरीत करण्यात येईल तरी इच्छुक ई-अॅटोरिक्षाधारकांनी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष  राधेश्याम चांडक यांनी केले आहे. या योजनेमुळे बुलडाणा शहरातील वायु प्रदुषण काही प्रमाणात तरी नियंत्रणात येईल, या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला तर ही योजना बुलडाणा अर्बनच्या सर्व शाखांवर सुरु करता येईल असेही राधेश्याम चांडक यांनी स्पष्ट केले.