बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
शेख मतीन शेख नजीर सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा देऊळघाट (जि. बुलडाणा ) यांना इनोव्हेटिव्ह टीचर ऑफ द इयर पुरस्कार २०२३ च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री संतोषजी बागरोडिया, दिल्ली सरकारचे मंत्री राजकुमार आनंद आणि मुद्रित माध्यमे, मास मीडिया, लेखक , पत्रकारांच्या व इतर प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार आणि शिखर परिषद 2023 राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार (इनोव्हेटिव्ह टीचर ऑफ द इयर) नेशनल एजुकेशन ब्रिलियंस अवार्ड २०२३ ह्या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली येथे 29 ऑक्टोबर 2023 रोजी जागतिक शिक्षक दिनानिमित्त आयोजित नेशनल एजुकेशन ब्रिलियंस अवार्ड 2023 मध्ये वैयक्तिक नामांकनांच्या श्रेणींपैकी एक ज्यामध्ये शिक्षक, संशोधक, प्राध्यापक, अध्यक्ष, संचालक, शैक्षणिक नेते, शास्त्रज्ञ इत्यादींचा समावेश आहे, वैयक्तिक नामांकनामध्ये शेख मतीन शेख नजीर यांची इनोव्हेटिव्ह टीचर ऑफ द इयर पुरस्कार २०२३ च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक मुले शाळा देऊळघाट, (तालुका व जिल्हा बुलढाणा) येथे सहाय्यक शिक्षक म्हणून आपली अधिकृत कर्तव्ये पार पाडत आहेत.
शेख मतीन यांनी यावर्षी इंग्रजी विषयात राज्य पात्रता परीक्षा (सॅट) उत्तीर्ण केली आहे. इतर विषयांबरोबरच त्यांना इंग्रजी विषयावर प्रभुत्व आहे. ते अत्यंत तळमळीने , स्वतःला झोकून विद्यार्थ्यांना शिकवतात आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. एक हुशार, ज्ञानी, सक्रिय, विद्यार्थी-अनुकूल असल्याने, ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेसाठी आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून विद्यार्थ्याना याचा देण्यावर त्यांचा भर असतो.
राष्ट्रीय पुरस्कारसाठी निवड होणे हे सर्व उर्दू माध्यमांच्या शाळा व शिक्षकांसाठी पण अभिमानास्पद आहे. या निमित्ताने पालक, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, व्यवस्थापन समिती, सर्व मित्रपरिवार व नातेवाईकांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
