* शहरातून विविध घोषणा देत काढला मोर्चा
मलकापूर : (इलियास शाह: एशिया मंच वृत्त)
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी उपविभागीय कार्यालयासमोर आज दि 30 ऑक्टोंबर पासून आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊन तहसील कार्यालय समोर उपोषणाला बसण्यासाठी शहरातून विविध घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.
मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळण्यासाठी अनेक वर्षापासून मराठा समाजाचा कायदेशीर बाजुने लढा सुरू आहे, अनेक शांततेच्या मार्गाने मुक मोर्चे निघाले तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजातील अनेक तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या करून समाजासाठी आपल्या अनमोल जिवाचे बलीदान दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली येथे सकल मराठा समाजाची देशातील सर्वात मोठी सभा झाली. मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी उपोषणाला बसले होते, महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने त्यावेळी त्यांचे उपोषण थांबवायला सांगुन एका महिन्याचा वेळ मागीतला होता परंतु अद्यापही आरक्षणा संदर्भात निर्णय झाला नाही, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा अंतरवाली येथे आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून व मराठा समाजाला ओबीसी आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तहसील कार्यालय मलकापूर समोर सकल मराठा समाजातील बांधव साखळी पद्धतीने उपोषणाला बसणार आहेत, त्यामुळे आमची रितसर मागणी आपण शासनापर्यंत पोहोचावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या साखळी उपोषणाला दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी पत्र देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
