लोणार तालुका पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारणीची निवड

लोणार तालुका पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारणीची निवड
लोणार : (एशिया मंच वृत्त)
      लोणार तालुका पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारणी च्या निवडी साठी स्थानिक विश्रामगृह येथे 15 ऑक्टोबर 2023 रोजी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद याच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये जेष्ठ मार्गदर्शक तथा सचिव बुलडाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे डॉ.अनिल मापारी , जिल्हा संघटनेचे उमेश पटोकार,  विठ्ठल घायाळ हे होते.
      कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व प्रथम   पत्रकारांचे आराध्य दैवत बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोला  पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक तथा सचिव बुलडाणा जिल्हा मराठी पत्रकार संघचे डॉ. अनिल मापारी, उमेश पटोकार, राहुल सरदार, विठ्ठल घायाळ  यांनी मार्गदर्शन केले.  उपस्थित पत्रकार यांनी  नवीन कार्यकारणीच्या निवडीचे सर्व अधिकार जेष्ठ मार्गदर्शक डॉ. अनिल मापारी यांना सर्वानुमते देण्यात आले. त्यांनी सर्व सदस्यशी चर्चा करून नवीन कार्यकारणीची घोषणा केली असून ती पुढीप्रमाणे अध्यक्ष प्रमोद वराडे,
कार्याध्यक्ष गोपाल तोष्णीवाल, सचिव सचिन गोलेच्छा, उपाध्यक्ष श्याम सोनुने, उपाध्यक्ष रमेश खंडागळे, कोषाध्यक्ष किशोर मोरे , सह कोषाध्यक्ष अशोक इंगळे, सह सचिव अनिल वायाळ,  सह सचिव किशोर मापारी, प्रवक्ता  राहुल सरदार, प्रसिद्धी प्रमुख शेख यासिन
यांची निवड करण्यात आली.
     नवीन कार्यकारणीची घोषणा होताच नवीन अध्यक्षाचा तथा कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला. नवीन अध्यक्ष यांनी जेष्ठ मार्गदर्शक तथा सचिव बुलडाणा जिल्हा मराठी पत्रकार संघचे डॉ. अनिल मापारी, मावळते अध्यक्ष शेख समद , मावळते सचिव पवन शर्मा यांचा सत्कार केला.  मावळते अध्यक्ष शेख समद यांनी मागील 2 वर्ष च्या कार्यकाळामध्ये दिलेल्या सहकार्यसाठी सर्वांचे आभार व्यक्त केले. नवीन अध्यक्षांनी संघटनेला गत वैभव प्राप्त करून देण्याचे  अभिवचन दिले व सर्वना सोबत घेऊन येणाऱ्या अडचणी सोडवून पत्रकार भवन तयार करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमाचे  संचालन गोपाल तोष्णीवाल यांनी तर आभार सचिव सचिन गोलेच्छा यांनी मानले. यावेळी सुनील वर्मा, विजय गोलेचा, संदीप मापारी, संतोष पुंड, ज्ञानू सुपेकर, प्रणव वराडे, रेहमान नौरंगाबादी, उमेश कुटे, नंदू डव्हळे यांच्यासह आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
q