महाराष्ट्रामध्ये भारत राष्ट्र समिती वाढविण्यासाठी गावा-गावात जाणार : निखिल दादा देशमुख
* BRS भारत राष्ट्र समितीचे 3 लाख सदस्य नोंदणीचे लक्ष
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
आगामी काळात महाराष्ट्र राज्य मध्ये तेलंगणा राज्याच्या धर्तीवर जसे या राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे आणि त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळून ते आज समाधान व्यक्त करीत असल्याचे प्रतिपादन आज 1 सप्टेंबर 2023 रोजी जिमखाना फिटनेस क्लब मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भारत राष्ट्र समितीचे पश्चिम विदर्भ समन्वयक निखिल दादा देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
BRS, भारत राष्ट्र समिती नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष द्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन वाढ आणि आगामी होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा, सह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगरपालिका मधील मतदारसंघाचा आढावा घेणे, संभाव्य आणि इच्छुक उमेदवाराची मुलाखत कार्यक्रम पुढील काळात सुरु करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाकडून भैयासाहेब पाटील यांचेकडे बुलडाणा जिल्हा समन्वयक से पदाची जबाबदारी देण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील राखीव मतदार संघ असलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये BRS चे विधानसभा प्रचार कार्यालय, पक्ष संघटन वाढ आणि बुलडाणा येथे BRS जिल्हा कार्यालय लवकरच सुरु करण्याची जबाबदारी भैयासाहेब पाटील यांचेकडे देण्यात येत आहे. पुढे बोलताना देशमुख म्हणाले, BRS पक्षाचे धोरण हे छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेले स्वराज बहुजन कष्टकरी शेतकरी, कामगार, मागासवर्गीय, अल्पसंख्य वर्गाच्या तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांचा विकास, जीवनमान उन्नती आणि शेत उत्पादनाची शासनाद्वारे हमी भावा नुसार खरेदी अशा ४५० योजनेनुसारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये २०२४ ला किसान सरकार आणण्याचा संकल्प पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव मुख्यमंत्री तेलंगणा राज्य यांनी केला आहे. या सर्व योजना अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राजकारणात शिक्षित, सामाजिक कार्य करणाऱ्या युवक, युवती, श्रेष्ठ नेते यांनी आगामी होणाऱ्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये ८० टक्के असलेल्या किसान शेतकरी वर्गास न्याय आणि अधिकार मिळवून देण्यास सहकार्य करावे असे आवाहन आजच्या पत्रकार परिषदेद्वारे केले आहे. आमचा संकल्प बुलडाणा जिल्ह्यात सद्या असलेले ८० हजार समिती सदस्य आणि पुढील काळात होणारी ३ लाख समिती सदस्य नोंदणी करून बुलडाणा लोकसभा ही बीआरएस जिंकरणारच असे नियोजन पक्षाकडुन केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गाव निहाय ११ समिती गठित करणार आहोत. यासाठी जिल्ह्यात ७ समन्वयक ची नियुक्ती याआधीच केली असून समिती सदस्य नोंदणी अभियान अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हा समन्वयक पदी भैय्यासाहेब पाटील यांना जबाबदारी देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी भैय्यासाहेब पाटील बुलडाणा जिल्हा समन्वयक, राजू इंगळे जिल्हा समन्वयक, राजेंद्र लहाने उपजिल्हा समन्वयक, राजेश पाटील जळगाव जामोद समन्वयक, जय दळवी मलकापूर समन्वयक, अक्षय पाटील बुलडाणा समन्वयक, रामराव शिंदे, अनिल पाटील, शशिकांत लोखंडे यांची उपस्थिती होती.
